निनाद विरकुड यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

 


पुणे दि.२९ (प्रतिनिधी) साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात निनाद विरकुड यांना यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. शिक्षक हेच समाजाची आदर्श पिढी घडवणारे शिल्पकार असून, त्यांच्याच कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने फाउंडेशन तर्फे दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावर्षीचा हा मानाचा सोहळा शिर्डीत पार पडला.



सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री. विठ्ठलराव जपे, श्री. स्वरूप कापे, श्री. निखिल वामन व श्री. दीपक चव्हाण* आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे *अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे व विश्वस्त श्री. अभिषेक तुपे* यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
यावेळी निनाद विरकुड यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणादायी अधिष्ठान मिळाले आहे.



बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा