जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

 

तळेगाव दाभाडे दि. 27 (प्रतिनिधी):
अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तसेच मावळ नगरसेवक श्री. संतोषभाऊ भेगडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहे. शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. सुशीला मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे संपन्न होणार आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. बबनराव भेगडे (ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, पुणे पीपल्स को-ऑफ बँक, पुणे) हे भूषविणार आहेत. गुणवंत शिक्षकांचा गौरव शुभहस्ते
मा. नामदार श्री. मुरलीधर (आण्णा) मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक, भारत सरकार)मा. नामदार श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)मा. श्री. निलेशजी लंके (खासदार, अहिल्यानगर) मा. श्री. संजय तथा बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) मा. श्री. सुनिल (आण्णा) शेळके (आमदार, मावळ) मा. श्री. भगवानराव (आप्पा) साळुंके (मा. शिक्षक आमदार, पुणे विभाग) यांच्या हस्ते होणार आहे.

 


मा. डॉ. गणपतराव मोरे (विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग), मा. डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्य. पुणे), मा. श्री. संतोष भेगडे (नगरसेवक, तळेगाव दाभाडे व पी. एम. आर. डी. सदस्य), मा. श्री. सुदाम बाळुंज (गटशिक्षणाधिकारी, पं. स. मावळ), मा. श्री. निलेश काशिद (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे), मा. श्री. महेश शेलार (कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



श्री. अशोक कराड (कार्याध्यक्ष), श्री. देवराम पारीठे (कार्यवाह), श्री. राम कदमबांडे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ), श्री. संतोष भेगडे (नगरसेवक, तळेगाव दाभाडे व अध्यक्ष, श्री. संतोषभाऊ भेगडे फाउंडेशन), श्री. अमित भसे (अध्यक्ष, श्री. डोळसनाथ पतसंस्था), श्री. शरद भोंगाडे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ), आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत  या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव होणार असून मावळ तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाला नवा सन्मान मिळणार आहे.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा