लोणावळा दि.१५ (प्रतिनिधी) व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी अभियंता दिन (Engineers day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमास संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भगवान आंबेकर, ॲड. संदीप अगरवाल, श्री. नितीन गरवारे व श्री. स्वप्नील गवळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभियंता दिनाचे (Engineers day) महत्त्व यावर माहितीपर सादरीकरण केले. त्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम पार पडला. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख, प्रा. सोनी राघो, प्रा. सायली धरणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा शाह, तसेच प्रा. किरण शारीकर, प्रा. तनुजा हुलावळे, प्रा. सुनिल परगे, प्रा. नम्रता जंगम, प्रा. अमिषा नाईक, प्रा. अनुप देशमुख, प्रा. श्रीकांत घाटगे, प्रा. मोनाली देशमुख, प्रा. मानसी बसुतकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. श्रद्धा पुजारी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनी दीक्षा सातपुते व नमिता कदम यांनी केले, तर आभारप्रदर्शन अंतिम वर्षातील विद्यार्थी हर्ष येवले यांनी केले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/
Comments
Post a Comment