अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

वडगाव मावळ दि. ४ (प्रतिनिधी) श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘स्वागत समारंभाचे (Induction Programme)’ आयोजन करते. या कार्यक्रमातून महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या गुणवत्तापूर्ण कार्यप्रक्रीयेच्या परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते. शैक्षणिक वर्ष २५ -२६ मध्ये हा कार्यक्रम ४ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना महाविद्यालयीन कार्यप्रणालीची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील योजनाची रूपरेषा मांडली. दीपप्रज्वलन आणि प्रतीमा पुजनानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी धनश्री चौधरी यांनी स्त्री शक्ती आणि शिक्षकाची भविष्यातील भूमिका यांची सांगड घालत संत परंपरेची समकालीन गरज अधोरेखित केली. यानंतर कार्येक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे ‘अंबर’ साप्ताहिकाचे संपादक सुरेशजी साखवळकर यांनी भारतीय ज्ञान परंपरेची कास धरणे सद्यस्थितीत किती आवश्यक...