तळेगाव दाभाडे दि.७ (प्रतिनिधी) : कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचे फीत कापून उद्घाटन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी व इतर मान्यवर
तळेगाव दाभाडे दि.6 (प्रतिनिधी) येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कायद्याचे शिक्षण हे समाजाच्या न्यायव्यवस्थेचा पाया आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे: आज येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या समर्थ शैक्षणिक संकुल येथे कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे हे उपस्थित होते.

प्रा. डॉ.गोसावी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी न्याय, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांच्या मूल्यांवर आधारित कारकीर्द घडवावी.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे अभियोग संचालनालयचे संचालक मा. श्री. अशोककुमार भिल्लारे, प्र - कुलगुरू, डॉ. पराग काळकर, मावळचे आमदार मा. श्री. सुनिल (आण्णा) शेळके, मानव विद्याशाखेचे डीन डॉ. विजय खरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे मा. अध्यक्ष, ॲड.राजेंद्र उमाप, संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे,संस्थेचे उपाध्यक्ष, मा. श्री. गणेश खांडगे, खजिनदार, मा. श्री. राजेश म्हस्के, सहसचिव, मा. श्री. नंदकुमार शेलार, तसेच संस्थेचे संचालक मा. श्री. दामोदर शिंदे, मा. श्री. महेशभाई शहा, मा. श्री. चंद्रकांत शेटे, मा. श्री. सोनबा गोपाळे, विनायक अभ्यंकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलास पौळ, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, श्री. नामदेव दाभाडे, श्री. दिपक हुलावळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड. राजेंद्र उमाप म्हणाले की,कायद्याचे शिक्षण किंवा पदवी घेतल्यानंतर समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकांनी बजावली पाहिजे. यावेळी बोलताना मावळचे आमदार मा. श्री. सुनिल शेळके म्हणाले की, तळेगाव दाभाडे हे तालुक्याचे शैक्षणिक हब बनलेले आहे त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे विधी महाविद्यालयामुळे नक्कीच जास्तीत जास्त कायदेतज्ञ तयार होतील. अध्यक्षीय मनोगतात श्री. संजय तथा बाळा भेगडे म्हणाले की, पुढील काळात विधी महाविद्यालयाचे महत्व वाढेल विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना समाजव्यवस्थेला कोर्ट कचेरी पासून कसे दूर ठेवता येईल अशी व्यवस्था निर्माण करावी. या विधी महाविद्यालयात राष्ट्राला अपेक्षित कायदेतज्ञ तयार होतील.यावेळी डॉ. विजय खरे, डॉ. पराग काळकर,मा. श्री. अशोक भिल्लारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

महाविद्यालयात आधुनिक वर्गखोल्या, समृद्ध वाचनालय, संगणक प्रयोगशाळा तसेच मूट कोर्ट रूमची सुविधा उपलब्ध आहेत याची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव व विधी महाविद्यालयाच्या कार्यकारणी समितीचे अध्यक्ष मा. श्री. संतोषजी खांडगे यांनी केले, सुत्रसंचालन श्री. सुनिल बोरुडे व श्री. बापुसाहेब पवार यांनी केले आभार संस्थेचे संचालक मा. श्री. विनायक अभ्यंकर यांनी मानले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/
Comments
Post a Comment