Posts

अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश: सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन पदावर होणार नियुक्ती

Image
 अनिकेत थोरात यांचे  एमपीएससीच्या परीक्षेत  घवघवीत यश: सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन पदावर होणार नियुक्ती पुणे (प्रतिनिधी) दि. 25 नुकताच राज्यसेवा 2021 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास 400 जागांसाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात  यांचे चिरंजीव अनिकेत थोरात यांनी घवघवीत यश संपादन केले असून सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन या पदावर त्यांची नियुक्ती निश्चित झालेली आहे. अनिकेत हा टीडीएफ चे राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक नेते जी.के. थोरात यांचा चिरंजीव असून लहानपणापासूनच त्याला प्रशासकीय सेवेची आवड होती. त्याने सीईओपी, मधून बी.टेक चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून तो कायमच गुणवत्ता यादीत आलेला आहे. अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता अशी त्यांची ओळख होती त्याने आपल्या यशातून हे सिद्ध केले. यापूर्वीच त्याने राज्यसेवेच्या परीक्षेतून नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली होती सध्या त्याचे या पदासाठीचे प्रशिक्षण चालू...

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम”संपन्न

Image
  लोणावळा (प्रतिनिधी) दि. १८ व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये दिनांक १७/०५/२०२३ रोजी एक दिवसासाठी “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” हा कार्यक्रम आयोजीत करण्याल आला, या कार्यक्रमावेळी प्रा. एम. गोपालकृष्ण् आणि प्रा. इवा सक्सेना(एमिटी ग्लोबल बिझनेस स्कुल) यांनी  “द सिक्रेट ऑफ कम्युनिकेशन स्किल ॲण्ड इंम्पाँर्टन्स ऑफ इफेक्टिव टिचिंग” या विषयावर प्रशिक्षण दिले.  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर  हे होते. सोबत मेकेनिकल विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसुरकर, कंम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. सोनी राघो, सिव्हील विभाग प्रमुख प्रा. प्राणेश चौव्हाण, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. मनिषा कचरे व आय, क्यु, ए, सी प्रमुख प्रा. हुसेन शेख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा या महाविद्यालयास नॅकचा B+ दर्जा प्राप्त

Image
लोणावळा (प्रतिनिधी) दि. ३ व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा या महाविद्यालयात नुकतेच नॅकचे मूल्यांकन झाले असून महाविद्यालयास नॅक B+ दर्जा प्राप्त झाला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव ठाकूर यांनी दिली. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सर्व संचालक मंडळ यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व स्टाफ चे अभिनंदन व कौतुक केले.

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

Image
लोणावळा (प्रतिनिधी) दि. ३ पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक ओसडेन डी’मेलो(सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर कोलोंबस आय. टी. ॲण्ड मॅनेजमेंट कन्सलटंट) यांनी विदयार्थ्यांना सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, प्रा. हुसेन शेख, डॉ. हरिश हरसुरकर, इतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी हजर होते.

प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार

Image
पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालय लोणावळा पुणे येथील प्राचार्य डॉ. शिवाजी बाळकू देसाई यांना नुकताच अविष्कार फाऊंडेशन यांच्या वतीने शिक्षण आमदार मा. जयंतआसगावकर साहेब व प्राध्यापक किशनराव कुराडे यांच्या हस्ते ज्योतिबा रॉयल्स रिसोर्ट, कोल्हापूर येथे शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत " महाराष्ट्र रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. डॉ. शिवाजी देसाई मागील २५ वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. तसेच मागील १३ वर्षेपासून ते सिह्गड टेकनीकन एज्युकेशन सोसायटी संस्थेत प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र रत्न पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आजपर्यंत त्यांनी 1० पदव्या, ५ पुस्तके ,  ३ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. त्याच्या मार्गदर्शन खाली २ विध्यार्थना पीएच.डी प्राप्त झाली  तर ८ विद्यार्थी त्यांकडे पीएच.डी चे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांचे २२ संशोधन पेपर हे आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशित झाले आह...

प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार

Image
  पुणे : एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज, आळंदी देवाची, पुणे येथील प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांना नुकताच अविष्कार फाऊंडेशन यांच्या वतीने शिक्षण आमदार मा. शिंदे साहेब यांच्या हस्ते ज्योतिबा रिसोर्ट, कोल्हापूर येथे शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत " महाराष्ट्र रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. डॉ. सुरेंद्र हेरकळ मागील 18 वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. तसेच मागील 8 वर्षेपासून ते एम. आय. टी संस्थेत प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र रत्न पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आला. आजपर्यंत त्यांनी 16 पदव्या, 8 पुस्तके , 1 पेटंट, 11 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. 6 विद्यार्थी त्यांकडे पीएच.डी चे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांचे 27 संशोधन पेपर हे आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रात अहवाल सादर केले आहेत. शिक्षक शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहायक विविध उपक्...

शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा: आमदार सत्यजित तांबे

Image
शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा: आमदार सत्यजित तांबे पुणे (प्रतिनिधी) दि. २५ नाशिक  पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे तसेच टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे शिक्षण आयुक्त मा.सुरज मांढरे यांच्या समवेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाविषयी बैठक घेऊन अनेक मुद्द्यावर चर्चा केली. या बैठकीस राज्याचे राज्याचे शिक्षण संचालक मा.कृष्णकांत पाटील, सहसंचालक हारून आतार, एसएससी बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक,उपसंचालक वाव्हळ मॅडम उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये  प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली 1) आधार व्हॅलिडेशन मुदत वाढवण्यात यावी. 2) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित बिले तात्काळ मार्गी लावण्यात यावी. 3) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दरवर्षी आयोजीत करण्यात यावे. 3) मागील वर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांचे दोन हजार रुपये घेतले होते ते माघारी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. 4) अनुकंपाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत. 5) पवित्र पोर्टल द्वारे लवकरात लवकर शिक्षक भरती सुरू करावी. 6) शिक्षकांच्यावर असणाऱ्या शाळाबाह्य कामांचा ताण कमी करावा. त...

प्राचार्य श्री. हरिश्चंद्र गायकवाड सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Image
पुणे (प्रतिनिधी) दि. २३ आज पै. हिरामण बनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष आदरणीय श्री. हरिश्चंद्र गायकवाड  सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा शिवशंकर सभागृह, महर्षी नगर पुणे ३७ येथे संपन्न झाला.   या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. जे.के. पाटील सर होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शिक्षण संचालक आदरणीय कृष्णकुमार पाटील सर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे मॅडम, शिक्षणाधिकारी राक्षे सर, माजी आमदार योगेश टिळेकर, एसएससी बोर्डाच्या माजी सचिव शकुंतला  काळे मॅडम, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. नंदकुमार सागर सर , मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव मा. शांताराम पोखरकर सर,चंद्रकांत मोहोळ सर, मा. सचिव अरुण थोरात सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड सर, शिक्षकेतर महामंडळाचे शिवाजीराव खांडेकर सर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी तसेच शिक्षण खात्य...

संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे जोतिबा फुले - डॉ. प्रमोद बोराडे

Image
 अध्यापक महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि.१७ अध्यापक महाविद्यालयात दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथील इतिहास प्रमुख व प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता धायगुडे ह्या होत्या. डॉ. बोराडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा बालपणा पासून चा जीवनपट उलगडून महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. सदर कार्यक्रम हा गुलमोहर गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर व नीलकमळ गटाच्या मार्गदर्शिका प्रा. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी मोनिका भोपळे हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. कामाचे अध्यक्ष डॉ. अनिता धायगुडे यांनी महात्मा फुले यांचे कार्य या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमती शिंदे व शुभदा शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना गुर...

तळेगाव स्टेशन येथे सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Image
  तळेगाव स्टेशन येथे सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ तळेगाव स्टेशन (वार्ताहर)  दि.17 यशवंत नगर येथील "भक्ती विहार"   बिल्डिंग मधून श्री.निनाद विरकुड यांच्या मुलीची सायकल Cycle BSA ladybird 17" aquablue colour मध्यरात्री 1. 11 मिनिटांनी 1 अज्ञात इसमाने राजरोस चोरून नेली आहे. चोरटा सी.सी. टीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे, सदरहू तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आहे. या बिल्डिंग मधील सायकल चोरीची ही  या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. श्री. बालाजी मंदिर च्या शेजारी अश्या प्रकारे राजरोस बिल्डिंग आवारातून सायकल चोरीस जाणे हे धोक्याचे लक्षण आहे. उद्या अशाप्रकारे फ्लॅट मध्ये  किंवा इतरही ठिकाणी सुद्धा राजरोस चोऱ्या होऊ शकतात .तरी आशा चोरीच्या घटनांवर वेळीच आळा घालणे सामाजिक  सुरक्षितता व प्रशासन स्तरावर आवश्यक आहे. अशाने तळेगाव दाभाडे चे नाव खराब होत आहे. - श्री. निनाद विरकुड तरी कृपया या घटनेची गंभीर दखल घेऊन  सदरहू इसम जर कोणाला आढळून आला तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.