तळेगाव स्टेशन येथे सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
तळेगाव स्टेशन येथे सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि.17 यशवंत नगर येथील "भक्ती विहार" बिल्डिंग मधून श्री.निनाद विरकुड यांच्या मुलीची सायकल Cycle BSA ladybird 17" aquablue colour मध्यरात्री 1. 11 मिनिटांनी 1 अज्ञात इसमाने राजरोस चोरून नेली आहे. चोरटा सी.सी. टीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे, सदरहू तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आहे. या बिल्डिंग मधील सायकल चोरीची ही या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.
श्री. बालाजी मंदिर च्या शेजारी अश्या प्रकारे राजरोस बिल्डिंग आवारातून सायकल चोरीस जाणे हे धोक्याचे लक्षण आहे. उद्या अशाप्रकारे फ्लॅट मध्ये किंवा इतरही ठिकाणी सुद्धा राजरोस चोऱ्या होऊ शकतात .तरी आशा चोरीच्या घटनांवर वेळीच आळा घालणे सामाजिक सुरक्षितता व प्रशासन स्तरावर आवश्यक आहे. अशाने तळेगाव दाभाडे चे नाव खराब होत आहे. - श्री. निनाद विरकुड
तरी कृपया या घटनेची गंभीर दखल घेऊन सदरहू इसम जर कोणाला आढळून आला तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment