वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून संतोष थोरात यांनी स्वलिखित पुस्तके दिली शालेय ग्रंथालयास भेट

 वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून संतोष थोरात यांनी

 स्वलिखित पुस्तके दिली शालेय ग्रंथालयास भेट




 पुणे, विमाननगर 15 ऑक्टोबर 2022

   15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. हा दिवस भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर पुणे या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिनाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमासाठी  संत गोरोबा शिक्षण संस्थेच्या कार्यवाह  तावरे तावरे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर जीवनात यश हमखास मिळते तसेच डॉ. कलाम यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले व वाचन संस्कृती टिकवण्यासाठी नियमित वाचन केले पाहिजे असेही सांगितले.

  यावेळी प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक संतोष थोरात यांनी स्वतः लिहिलेल्या TOTAL ENGLISH GRAMMAR AND COMPOSITION  या इंग्रजी पुस्तकांचा संच शालेय ग्रंथालयास भेट दिला. सदर पुस्तक हे अतिशय साध्या व सोप्या भाषेत लिहिलेले असून इंग्रजी व्याकरण सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होईल असे मत यावेळेस त्यांनी व्यक्त केले. या पुस्तकांचा स्वीकार संस्थेच्या कार्यवाह किरण तावरे मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ व ग्रंथालय विभाग प्रमुख पुनम पवार यांनी केला.

  यावेळी संस्थेच्या कार्यवाह किरण तावरे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ यांनी थोरात सरांचे आभार व्यक्त करून भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश