जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते: किरण तावरे

 जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते: किरण तावरे 




वाचन प्रेरणा दिनानिमित्त केले विचार व्यक्त

पुणे, विमाननगर,15 ऑक्टोबर 2022

 

विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द,चिकाटी व कठीण परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनामध्ये यश हमखास मिळते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, पुस्तकांचे नियमित वाचन केले पाहिजे यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते असेही यावेळी त्या म्हणाल्या. आनंद विद्यानिकेतन हायस्कूल,विमाननगर या प्रशालेमध्ये डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्या प्रमुख पाहुण्या होत्या.

  वाचन प्रेरणा दिनानिमित्त संतोष थोरात यांनी डॉ. कलाम यांचे जीवन चरित्र तसेच त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देेऊन वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले.

 प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ, माजी मुख्याध्यापक  विनायक घोगे त्याचप्रमाणे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सर्वांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

   यावेळी प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक  संतोष थोरात यांनी स्वतः लिहिलेल्या Total English Grammar and Composition या इंग्रजी व्याकरण पुस्तकाच्या पाच प्रती शालेय ग्रंथालयास भेट म्हणून दिल्या. तसेच माजी मुख्याध्यापक विनायक घोगे यांनी ग्रंथालय पुस्तके खरेदीसाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली. या दोन्ही भेटीचा स्वीकार संस्थेच्या कार्यवाह किरण तावरे, प्रशालेचे मुख्याध्यापक मासाळ सर ग्रंथालय विभाग प्रमुख पुनम पवार यांच्याव तीने करण्यात आला.

  कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्याने करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मासाळ सर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश