खुटबाव येथील जय हिंद ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने आगळ्या वेगळ्या दीपावली महोत्सवाचे आयोजन
खुटबाव येथील जय हिंद ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने आगळ्या वेगळ्या दीपावली महोत्सवाचे आयोजन.
पुणे दि.17 (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) खुटबाव, तालुका दौंड येथील जय हिंद ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 20, 21 व 22 ऑक्टोबर या दिवशी दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष जी. के.थोरात यांनी कळवले आहे. या तीन दिवसांमध्ये प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवामध्ये सर्वांसाठीच वेगवेगळे कार्यक्रम असून एका वेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी दिवाळीच्या निमित्ताने मिळणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत ग्राम भूषण गौरव समारंभ अंतर्गत खुटबाव गावासाठी सार्वजनिक विकासात योगदान देणाऱ्या, गावाच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या 8 कर्तुत्ववान ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे तसेच युवती व महिला भगिनींसाठी सुभाष यादव प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच विद्यार्थी, युवक व शेतकऱ्यांसाठी आजच्या तरुणांपुढील आव्हाने या विषयांंर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली ताई चाकणकर, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बाप्पू पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दत्तामामा भरणे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, युवा नेते गणेश दादा थोरात, जिल्हा दुध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, उद्योजक राजेंद्र दादा थोरात, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंडचे माजी सभापती राणीताई शेळके, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माऊली थोरात, राहुलदादा दिवेकर, माजी उपसभापती नितीन भाऊ दोरगे, तसेच दौंड तालुक्यातील सरपंच आजी-माजी सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाचा आस्वाद पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आव्हान प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष जी.के थोरात सर, अध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे सचिव हनुमंत थोरात तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment