माध्यमिक शाळा व शिक्षकांच्या अनुदानाबाबत शासन उदासीन, सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज: आमदार संग्रामदादा थोपटे
भोर, 2 ऑक्टोबर 2022
जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा दिमाखात संपन्न.
माध्यमिक शाळा व शिक्षकांचे अनुदानाबाबत तसेच त्यांच्या समस्या बाबत सरकार उदासीन असून कायम विनाअनुदानित, अंशतः विनाअनुदानित व टप्पा अनुदानावरील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात भोर - वेल्हे: मुळशी चे कार्यसम्राट आमदार मा. संग्राम दादा थोपटे यांनी प्रतिपादन केले.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा टीडीएफ व पुणे जिल्हा महिला शिक्षिका संघाच्या वतीने भोर येथील भोरेश्वर लॉन्स मंगल कार्यालय मध्ये जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 65 मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भोर तालुक्यातील पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य टीडीएफचे विश्वस्त मा. के. एस. ढोमसे तसेच राज्य कार्याध्यक्ष मा.जी.के.थोरात सर उपस्थित होते
यावेळी ढोमसे सर व थोरात सर यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटना पातळीवर राबवत असलेल्या उपक्रम तसेच शिक्षक पुरस्कार योजने बाबत माहिती दिली शासन स्तरावर असे पुरस्कार प्रदान करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच शासकीय स्तरावरून शिक्षकांच्या समस्या, अनुदानाचे प्रश्न तात्काळ सोडवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कृष्णा शिंनगारे ,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष साखरे ,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह पंकज घोलप,उपाध्यक्षा स्नेहल बाळसराफ,राज्य समन्वयक प्रदीप गाढवे, पुणे जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे ,सचिव राजेंद्र पडवळ,पुणे शहर
टीडीएफ चे अध्यक्ष शिवाजीराव कामथे,सचिव संतोष थोरात, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. सचिन दुर्गाडे पुणे जिल्हा टीडीएफ चे कार्याध्यक्ष मा.तानाजी झेंडे, पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कारकर,सचिव दत्तात्रय रोकडे,पुरंदर तालुका अध्यक्ष बाबुराव गायकवाड,सचिव जालिंदर घाटे,संजय भिंताडे,दिलीप पापळ,प्रशांत बेंगळे,अशोक दरेकर विलास जगताप, अशोक नाळे संतोष सहाणे,अरुण खेडकर,प्राचार्य राहुल येळे तसेच माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या अमूल्य योगदानाबद्दल माजी मंत्री माननीय अनंतराव थोपटे साहेब यांना संघटनेच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना पुणेरी पगडी, शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष मा. धोंडिबा कुमकर सर तसेच सूत्रसंचालन भोर तालुका अध्यक्ष जयवंत थोपटे सर व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ दामगुडे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शेटे, माया तळेकर तसेच भोर तालुका माध्यमिक शिक्षक संघ व भोर तालुका टीडीएफ महिला पदाधिकारी यांनी केले. मान्यवरांचे आभार भेलके सर यांनी मानले.
Comments
Post a Comment