विश्रामधाम वृध्दाश्रमात अनोखी दिवाळी साजरी

 विश्रामधाम वृध्दाश्रमात अनोखी दिवाळी साजरी


तळेगांव दाभाडे (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.22 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील विश्रामधाम वृध्दाश्रमात आजी-आजोबा यांच्या समवेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीची सुरुवात अतिशय प्रसन्न व उत्साहात साजरी करण्यात आली. विचारमंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ.स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना गेली दोन तपाहून अधिक काळ दिवाळी साजरी करताना आजी-आजोबा यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि त्यांचा दिवाळी साजरा करण्याचा उत्साह आम्हा सर्वांना उर्जा प्राप्त करुन देतो तसेच आपल्या हिंदू धर्मा तील पवित्र सण जेष्टांच्या समवेत साजरा करत असताना एकत्र कुटुंबातील मंगलमय व आशिर्वादाच्या वातावरणात साजरा करण्याची अनुभूती मिळते. या प्रसंगी वृध्दाश्रमात रांगोळी रेखाटून आकाशकंदील , पणत्यांची रोषणाई केल्याने परिसर उजळून जातो.अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होत असल्याने आजी-आजोबा यांच्या मनोरंजनातील सहभागामुळे आनंद द्विगुणित झाला.वृध्दाश्रमातील दिवाळी म्हणजे ऋणानुबंधाचे नाते दृढ होत असल्याची भावना व्यक्त करून वृध्दाश्रमातील सर्वांना जगण्याची नवी उमेद प्राप्त होत असल्यचे आवर्जुन सांगितले.   

              सावित्रीबाई फुले विचारमंचच्या वतीने या कार्यक्रमात  वृध्दाश्रमातील श्री. अनिल टिपणीस यांनी  दरवर्षी दिवाळी सण आमच्या नातवंडा समवेत साजरी करण्याची प्रचिती येत असल्याने आम्ही या क्षणाची वाट पहात असतो सौ.बाळसराफ यांच्यामुळे परिवारात दिवाळी साजरी होत असल्याने आमच्या आनंदाला सीमा रहात नाही असे मत व्यक्त केले.श्री.संजीव जाधव यांनी सुरेख आकाशकंदील केला व मिठाई दिली .जान्हवी लचके,गौरजा गायकवाड, तृप्ती लाड, तनुजा उगीले,मानसी बनसोडे,प्रांजली वाबळे,अन्वी शिंगोटे यांनी आपले विचार व्यक्त केले आजी-आजोबा यांच्या आशिर्वादानेच आम्ही यशस्वी होऊ असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरजा गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन जानव्ही लचके यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश