डॉ.वैभव जाधव यांना पितृशोक



तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.5 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ वैभव जाधव यांचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कै. गोविंदराव जाधव यांचे बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा पंचक्रिया विधी रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता ऋणानुबंध हॉल, रामकुंड, कपालेश्वर जवळ, नाशिक या ठिकाणी होणार आहे. कै.गोविंदराव सुपडू जाधव यांच्या पश्चात त्यांचे पत्नी,भाऊ, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश