इंग्रजी चे तज्ञ मार्गदर्शक प्रवीणकुमार हुलावळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर
इंग्रजी चे तज्ञ मार्गदर्शक प्रवीणकुमार हुलावळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर
दि.1 ऑक्टोबर 2022
मावळ तालुक्यातील देवघर विद्यालयातील इंग्रजीचे आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रवीण कुमार पाटीलबुवा हुलावळे यांना नुकताच माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टीडीएफ यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रवीण कुमाकुमार हुलावळे हे गेली 15 वर्ष इंग्रजी चे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेले आहे. तसेच यांना अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्व स्तरांमधून सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ 2 ऑक्टोबर सकाळी. अकरा वाजता भोर येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी भोर चे माजी आमदार, अनंतराव थोपटे साहेब, आमदार संग्राम दादा थोपटे, टीडीएफ चे राज्य कार्याध्यक्ष जी. के. थोरात, राज्य विश्वस्त के. एस. ढोमसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, सचिव पंकज घोलप,टीडीएफ चे जिल्हाध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे शहराध्यक्ष आमचे, सचिव संतोष थोरात, अध्यक्ष सचिन दुर्गाडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.संदीप गाडेकर तसेच शिक्षक संघाचे व टीडीएफ चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment