ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे - संतोष खांडगे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे - संतोष खांडगे
पवनानगर - (संपादक- डॉ. संदीप गाडेकर) दि.23 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे असते तसेच शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे असल्याचे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले.
पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलातील कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थांंचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे,पवना शिक्षण संकुलाचे पालक व सरपंच परिषेदेचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे,संत तुकाराम साखरकारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर,मावळ बाजार समिती अध्यक्ष नंदकुमार धनवे,मावळ खादी ग्रामउद्योग अध्यक्षा कांचन भालेराव,भाजपा विद्यार्थी कार्याअध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,मावळ काॕग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्ला शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, भोंगाडे ग्रुपचे भरत भोंगाडे, लोहगडचे चेअरमन गणेश धानिवले,कडधे सरपंच संजय केदारी,ठाकुरसाईचे सरपंच नारायण बोडके, शालेय समिती सदस्य नारायण कालेकर,प्रल्हाद कालेकर,प्राचार्या अंजली दौंडे,पर्यवेक्षिका निला केसकर,प्राथमिक विभागाचे प्रमुख गणेश साठे,तिकोणा उपसरपंच ज्ञानेश्वर मोहोळ,कामगार नेते संदिप पानसरे, महागाव सोसायटीचे तज्ञ संचालक बबनराव पडवळ,माजी उपसरपंच आनंता वर्वे, पोलिस पाटील अनंता खैरे, यांंच्यासह पालक शिक्षक उपस्थीत होते.
पवना शिक्षण संकुलातील पालक सदस्य सुनिल भोंगाडे यांनी विद्यार्थांंना मार्गदर्शन करताना शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती असून देशाच्या विकास प्रक्रियेत वेळोवेळी शिक्षकांवर विविध जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. जबाबदाऱ्या शिक्षक समर्थपणे पेलून दाखवत विद्यार्थी घडवत असतात असे विचार व्यक्त केले.
यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत पाहुण्यांची व उपस्थितांचे मने जिंकली
कार्यक्रमाचे संयोजन कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या अंजली दौंडे,तर सुत्रसंचालन आडकर दुश्मन यांनी केले.
Comments
Post a Comment