व्हॉलीबॉल स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघास विजेतेपद

 व्हॉलीबॉल स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघास विजेतेपद




तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि. 5 क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि ४) रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर आण्णासाहेब चोबे स्कूल व कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. 

१९ वर्षाखालील मुलांच्या गटात इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांकांची विजयश्री संपादित केली तर लोणावळ्याच्या व्हीपीएस हायस्कूल व तळेगावातील आण्णासाहेब चोबे हायस्कूल या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. 

या संपूर्ण स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील गटांमध्ये उत्कृष्ट व चमकदार कामगिरी करणा-या खेळाडूस उत्कृष्ट खेळाडूचा किताब देऊन गौरविण्यात आले. १७ वर्षाखालील गटात इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलचा शुधांशू सिंह हा उत्कृष्ट खेळाडू ठरला असून १९ वर्षाखालील गटात इंद्रायणी महाविद्यालयाच्या कुशल यादव यांनी उत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला.

बीएमके समुहाचे संचालक विक्रम काकडे, व्हीपीएस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आदिनाथ दहिफळे, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक जाधव आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश