संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळात महापरिनिर्वाणदिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळात महापरिनिर्वाणदिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि. 6 वडगाव येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरकचंद रायचंद बाफना अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय  (बी.एड. व एम.एड.) व  कला वाणिज्य व बी.बी.ए. महाविद्यालयाच्या वतीने 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 


सर्वप्रथम प्राचार्य श्री. हिरामण लंघे, प्र.प्राचार्य श्री. अशोक गायकवाड व ज्येष्ठ प्राध्यापक श्री. महादेव सांगळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डी.एड. ची  विद्यार्थिनी हर्षदा पवार हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयक माहिती सांगितली, त्यानंतर प्र.प्राचार्य श्रीअशोक गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र डोके यांनी केले व आभार श्री. मनोज गायकवाड सर यांनी केले यावेळी संस्थेतील सर्व विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश