पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेवर आपले विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व:76 वर्षाची परंपरा मोडीत काढून विजयश्री आणली खेचून
पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेवर आपले विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व:76 वर्षाची परंपरा मोडीत काढून विजयश्री आणली खेचून
पुणे, (प्रतिनिधी) दि.16
पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपले विकास पॅनेल व आपले पॅनेल या दोन प्रमुख पॅनेल मध्ये सरळ लढत झाली. आपले विकास पॅनेल ने आपले पॅनेलचा13/0 फरकाने दणदणीत पराभव करून पतसंस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.
पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतपेढीची स्थापना1945 मध्ये कै. गो. चाफेकर यांनी केली,तेव्हापासून आजपर्यंत संस्थेवर आपले पॅनेलचे वर्चस्व राहिलेले आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच शहरातील मध्यवर्ती भागातली पेठांच्या शाळांचा व तेथील मतदारांची कायमच महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनेलने ही परंपरा मोडीत काढून या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 13 उमेदवार निवडून आणून सत्ता स्थापन करून नवीन इतिहास घडविला आहे.
आपले विकास पॅनलने कपबशीच्या चिन्हावर नरेंद्र नागपुरे, विठ्ठल भरेकर, राजेंद्र गाढवे सर, विजयराव कचरे, प्राचार्य शिवाजीराव कामथे, शिवाजी खांडेकर, हरिश्चंद्र गायकवाड, प्रा. सचिन दुर्गाडे, अवधुतकर सर, आबा गायकवाड, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे प्रसादजी आबनावे, प्रथमेश आबनावे सर्व पदाधिकारी तसेच वरिष्ठ, आजी-माजी अध्यक्ष,संचालक व सभासदांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली गेली. आपले विकास पॅनेल मध्ये सर्व गुणसंपन्न योग्य असे उमेदवार दिले गेले. पतपेढीचा पारदर्शक कारभार, पतपेढीची एककेंद्री सत्ता, मनमानी निर्णय या मुद्द्यावर प्रामुख्याने निवडणूक लढवली गेली व सर्व सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद देऊन आपले विकास पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी केले. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा विजय संपादन करून एक नवीन पर्व सुरू केले.
प्रामुख्याने आपले विकास पॅनेल, पुणे शहर मुख्याध्यापक संघ, पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी (TDF ) पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ, पुणे शहर शिक्षकेतर संघटना, पुणे शहर कलाध्यापक संघ, पुणे शहर शारीरिक शिक्षक संघटना, पुणे शहर महानगरपालिका शिक्षक कर्मचारी संघ या सर्वांनी एकमताने, एकजुटीने आपले विकास पॅनेल ची बांधणी करून एकत्रितपणे निवडणूक लढवली व दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये मिळवला.
*1) निवडणुकीतील एकूण मतदान=1747*
*2) निवडणुकीत एकूण झालेले मतदान=1227*
*3) निवडणुकीत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी= 70.23*
निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनेलचे विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली एकूण मते पुढील प्रमाणे
*सर्वसाधारण गट*
1) कचरे विजय - 731
2)पुष्पक कांदळकर-680
3) कामथे शिवाजी-706
4) घोलप संदीप-674
5) नाईक दत्तात्रेय-671
6) मुजावर राज-638
7) लोंढे संजय-666
8)हेगडकरदत्तात्रय-632
*2) महिला गट*
1) सौ हर्षा पिसाळ-703
2) डॉ. मंगल शिंदे-684
*3) इतर मागास गट*
1) डॉ.कल्याण वाघ-684
*4) भटक्या विमुक्त* जाती /जमाती
1) तरटे धोंडीबा-717
*5) अनुसूचित जाती/ जमाती*
1 ) महादेव माने-707
निवडणुकीच्या विजयाची सांगता सभा मोठ्या जल्लोषात विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे अशोक विद्यालय,टिळक रोड येथे झाली. यावेळी पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक नरेंद्र नागपुरे सर, विठ्ठल भरेकर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड सर, शिक्षकेतर संघाचे शिवाजीराव खांडेकर सर, विजयराव कचरे, आबणावे सर,पुणे शहर मुख्या.संघाचे अध्यक्ष मा.सुजित जगताप सर,ताकवले सर, आबा गायकवाड, डॉ.मंगल शिंदे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी अनिल गुंजाळ साहेब यांनी सर्व उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व सर्वांचे अभिनंदन केले.
सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले आभार पुणे शहर टीडीएफ चे कार्यवाह प्रा. संतोष थोरात यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment