ट्रेकिंग पलटण पुणे यांचा कासारसाई टेकडी परिसरात स्वच्छता करून नवीन वर्ष २०२३ चा शुभारंभ


तळेगांव दाभाडे  (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.1 कासार साई टेकडी परिसरात को-हाळेश्वर मंदिर, वाघजाई मंदिर आणि नैसर्गिक भुयार इ. महत्वाची स्थळे आहेत. येथून कासार साई धरणाचे सुंदर दृश्य दिसते. या परिसरात भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येवू लागले आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याच्या बाटल्या, पॅकेट्स, कोरडा खावूच्या पिशव्या असा पर्यावरणास घातक कचरा वाढत आहे. परिसरात स्थानिक प्रशासन मार्फत स्पष्ट सूचना फलक ठिकठिकाणी लावलेले असून सुद्धा परिसरात काही पर्यटक कचरा करून परिसर अस्वच्छ करीत असतात.


ट्रेकिंग पलटन गृप च्या सदस्यांनी 1 जानेवारी 2023 च्या रोजी दिवशी या परिसरात स्वच्छता अभियान राबवून नवीन वर्ष साजरे केले.

या मोहिमेत श्री. प्रदीप पाटील, श्री. विलास करपे, श्री. संदीप चौधरी,  श्री. अमोल गोरे, श्री. ज्ञानेश्वर पुरी आणि डॉ सुरेश इसावे यांनी योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश