विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण..... शरद सोनवणे
माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने 26 गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ..
राजूरी (प्रतिनिधी) दि.10 विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरीसुद्धा शिक्षकांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही, अशा आशयाचे प्रतिपादन जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे यांनी येथील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी हे होते.
जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी आणि जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघ यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुणवंत शिक्षक शिक्षकेतर पुरस्काराने राजुरी येथील विद्या विकास मंदिर मध्ये गौरवले गेले, यावेळी श्री सोनवणे बोलत होते .श्री सोनवणे म्हणाले की," प्राचीन काळापासून गुरूंचे महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही. जीवनामध्ये संस्कारांचे रोपण करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. आर्थिक आणि सामाजिक क्रांती करण्याचे खूप मोठे सामर्थ्य शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. म्हणून शाबासकीची थाप शिक्षकांच्या पाठीशी नेहमी असली पाहिजे त्यामुळे त्यांना एक प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते."
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री आवारी म्हणाले की," शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनेची आवश्यकता आहे. संघटनेच्या माध्यमातूनच अनेक गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम केले तर एक वेगळ्या प्रकारचे समाधान त्याला मिळत असते."
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, युवा नेते अमित बेनके,अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के .एस. ढोमसे, महाराष्ट्र राज्य टीडीएफ चे कार्याध्यक्ष जी.के .थोरात यांनीही मनोगते व्यक्त केली.
व्यासपीठावर शरद चौधरी, नेताजी डोके, प्रिया हाडवळे,ज्ञानेश्वर शेळके, एम.डी .घंगाळे, बबनराव हाडवळे,गोविंदराव औटी,बाळासाहेब हाडवळे, वल्लभ शेळके, वसंतराव ताकवले, पंकज घोलप, मुरलीधर मांजरे, राजेंद्र पडवळ, प्रदीप गाढवे, जी.के.औटी, रोहिदास वेठेकर, दत्तात्रेय अरकडे, रमेश ढोमसे, विजय घोलप, रवींद्र डुंबरे, कमल शिरोळे,सविता ताजणे, मीरा डुंबरे, उषा सावंत, जयश्री कदम,मंगेश डुंबरे, राजेंद्र गाडेकर, संतोष सहाणे,जयश्री चौधरी,राजेंद्र सुतार, हनीफ शेख, प्रशांत घुले, ज्ञानेश्वर केंद्रे,संतोष कांबळे, चंद्रकांत दुरगुडे, सुनील पोकळे, जगन्नाथ गाढवे, प्रमोद जाधव,भाऊसाहेब शिंदे,बाळकृष्ण लोहकरे, संदीप दातीर, राजेंद्र पापडे, धीरज सोनवणे, विश्वास भालिंगे,सारिका नलावडे,अर्चना भारती,मनीषा पाटील,निलेश काशीद, संतोष सगर, संतोष ढोबळे,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील 26 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गौरवले गेलेले गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुढीलप्रमाणे..
युवराज निवृत्ती कोटकर (मुख्याध्यापक, गा. म. वि.ओतूर.), बाळासाहेब दत्तात्रेय कवडे (मुख्याध्यापक, कृष्णराव मुंढे विद्यालय ,जुन्नर), लता बबन वारुळे (मुख्याध्यापिका, ज्ञानदा माध्यमिक विद्यालय,मंगरूळ), रंजना भिमाजी बोऱ्हाडे(मुख्याध्यापिका, माध्यमिक विद्यालय , गुंजाळवाडी), शांताराम बबन फापाळे (प्र.मुख्याध्यापक, बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, तांबे), सुलोचना भास्कर कदम (उपशिक्षिका, विद्या विकास मंदिर राजुरी), संतोष विष्णू विश्वासराव (उपशिक्षक,भा .बोरा हायस्कूल, आपटlळे), सुरेश चंद्रकांत लांडे (उपशिक्षक अण्णासाहेब आवटे, जुन्नर), निर्मला दत्तात्रेय भोर (उपशिक्षिका,रे. बा. देवकर, वडगाव आनंद), राजश्री रावजी लोहोटे(उपशिक्षिका, सुभाष विद्यामंदिर, पिंपळवंडी), प्रदीप रंगनाथ सूर्यवंशी (कला शिक्षक, सावित्रीबाई फुले ओतूर), नारायण गवजी लोखंडे(उपशिक्षक, शितळेश्वर विद्यालय, सितेवाडी), ज्योत्स्ना भाऊसाहेब शिंदे(उपशिक्षिका, छत्रपती हायस्कूल, येणेरे) योगेश सुरेश शेळके (उपशिक्षक ,न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी), मंगेश मधुकर तांबे (उपशिक्षक, चैतन्य विद्यालय ,ओतूर), विकास अनंत गोसावी (उपशिक्षक, श्री बेल्हेश्वर, बेल्हे), राजेंद्र दिगंबर गाडेकर (उपशिक्षक ,विद्या विकास मंदिर , राजूरी), संदीप सुखदेव भवारी (उपशिक्षक, ज्ञान मंदिर हायस्कूल, आळे), बाळासाहेब कोंडीराम तेलोरे (उपशिक्षक, श्री संत तुकाराम विद्यालय ,निरगुडे), मालती रासकर(उपशिक्षिका, शा. आश्रम शाळा, सोमतवाडी), सुजाता जितेंद्र डुंबरे (उपशिक्षिका, श्री सद्गुरु सिताराम महाराज विद्यालय ,पिंपरी पेंढार), मंगेश उत्तमराव डुंबरे (लिपिक, पुष्पावती विद्यालय ,डिंगोरे), शांताराम शंकर भारमळ (सेवक, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुll), राजू बाळू वाकचौरे(सेवक, न्यू इंग्लिश स्कूल ,निमगिरी), सिंधू भास्कर गोल्हार (ग्रंथपाल, श्री ब्रम्हनाथ विद्यालय, पारुंडे), विलास रभाजी गुंजाळ (सेवक, श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल ,रानमळा).
याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर चमकलेले आर्या विकास गोसावी , पार्थ मंगेश डुंबरे,श्रुती रामदास उंडे,श्रीकृष्ण राजेंद्र फलके , मानसी भाऊसाहेब सप्रे,प्रतीक चंद्रकांत नायकोडी,राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रकल्पाची निवड झाल्याबद्दल सार्थक तुषार आहेर व समर्थ विवेक शेळके तसेच मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल के एस ढोमसे यांचा सर्व संघटनांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रlस्ताविक पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह पंकज घोलप यांनी तर टीडीएफचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खाडे व शिक्षिका संघाच्या अध्यक्षा सरिता आबक यांनी सूत्रसंचालन केले. टीडीएफच्या उपाध्यक्षl सौ.शोभा तांबे यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment