राजमाता जिजाऊ मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा

 राजमाता जिजाऊ मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  सौ.रूपालीताई चाकणकर



 पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ३० पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुणे शहरातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिकांसाठी राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराचे आयोजन पत्रकार भवन ,गांजवे चौक, नवी पेठ येथे करण्यात आलेले होते. यावेळी रूपालीताई चाकणकर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समाज शिक्षित व संस्कृत करण्यामध्ये शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असून शिक्षकाचे कार्य अतुलनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकच एखाद्या विद्यार्थ्यांचा आयुष्य कसं चांगलं घडू शकतात याचा निर्वाळा दिला.

   यावेळी पुणे शहरातील तेरा मुख्याध्यापिकांना राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका, बत्तीस शिक्षिकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत  पुरस्कार देऊन राज्य टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.



  तसेच पुणे विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले श्री. शिवाजीराव खांडेकर यांचा तसेच पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतपेढी मध्ये विजयी झालेल्या तेरा संचालकांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सन्मान टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला.यावेळी राज्य टीडीएफचे विश्वस्त के.एस.डोमसे सर यांची महाराष्ट्र राज्य संयुक्त महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालयीन टीडीएफ च्या अध्यक्षपदी पै.हिरामण बनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय शशिकांत शिंदे सर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच श्री.अरविंद मोडक यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे रूपालीताई चाकणकर व राज्य टीडीएफ च्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे समुपदेशक, लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील शिक्षक, टीडीएफचे शहर संघटक श्री. भगवान पांडेकर यांनी तयार केलेले विद्यार्थी व पालकांना अतिशय उपयुक्त असलेले करियर विषयक मार्गदर्शक मोबाईल ॲपचे मान्यवरांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले.

  यावेळी राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात सर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यापुढे सविस्तर माहिती दिली व सदर समस्या तात्काळ सोडवण्याबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. यावेळी राज्य टीडीएफचे विश्वस्त के. एस.ढोमसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

    रूपालीताई चाकणकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत लवकरच मा.शिक्षणाधिकारी,मा.उपसंचालक यांची राज्याचे शिक्षण आयुक्त  यांच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष व पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सुनील राजे निंबाळकर, प्रा. संतोष थोरात प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार संतोष दुर्गाडे यांनी मानले.

 सदर कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षा सौ.स्वाती उपार, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे खजिनदार प्रथमेश आबणावे, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. सुजित जगताप, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा. अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष भानुदास रिठे,शहर टीडीएफचे कार्याध्यक्ष प्राचार्य अविनाश ताकवले,पुणे शहर  माध्य.शिक्षक संघाचे सचिव संजय ढवळे,उपाध्यक्ष बाबासाहेब ईमडे ,शहर महिला टीडीएफच्या अध्यक्षा विद्याताई पवार,माध्यमिक शिक्षका संघाच्या अध्यक्षा डॉ.उज्वला हातागळे, पुणे शहर अनुदानित व विनाअनुदानितचे अध्यक्ष अशोक धालगडे, संजीव यादव,संजय सोनवणे ,बाबासाहेब ठवाळ, दत्ता भाले,प्रितम बर्गे,दत्ता हेगडकर,धोंडीबा  तरटे,पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतपेढीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजयराव कचरे, सर्व संचालक मंडळ ,पुणे शहर टीडीएफचे उपाध्यक्ष, राज मुजावर, सुनील गिरमे,बाबुराव दोडके,रेश्मा ताई यादव, डॉ. मंगल शिंदे. सौ.हर्षा पिसाळ, कार्याध्यक्ष दत्तात्रय आरकडे, माधवीताई पांढरकर, पुणे शहर टीडीएफचे प्रसिद्ध प्रमुख संतराम इंदुरे, उपाध्यक्ष द्वारकानाथ दहिफळे, प्रशांत आबने तसेच टीडीएफचे व माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश