ॲड् पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 ॲड् पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती  साजरी

 तळेगांव स्टेशन (संपादक -डॉ.संदीप गाडेकर) दि. 4 ॲड् पु.वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती  साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक  श्री. सोनबा गोपाळे सर, महिंद्रा सी आय इ कंपनीचे गुणवंत कामगार,पर्यावरण प्रेमी  श्री. संदीपजी पानसरे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री. नितीन  पोटे,  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक श्री. कापरे पांडुरंग ,ज्येष्ठ अध्यापिका सौ.रजनी बधाले  ,कार्यक्रमासाठी इयत्ता सहावी ब मधील सावित्रीबाईंची वेशभूषा केलेली विद्यार्थिनी कु.डिखळे अर्पिता व ज्योतिबांची वेशभूषा केलेले कु. राऊत वर्षा या सर्वांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.श्री पांडुरंग पोटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार पर्यावरण पूरक तुळशीचे रोप देऊन करण्यात आला. 

       नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव  श्री.संतोष खांडगे साहेब,सहसचिव शालेय समितीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या निमित्ताने  श्री. संदीपजी पानसरे  यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना शंकर शांताराम गुप्ते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सॅनेटरी वेंडिंग मशीन शाळेकडे सुपूर्त करण्यात आले.   स्वच्छता व आरोग्य या विषयावर माहिती श्री संदिप पानसरे  यांनी सांगितली. श्री. सोनबा गोपाळे सर यांनी अध्यक्षीय मनोगतून  शाळेचे माजी विद्यार्थी ते एका संस्था संचालकापर्यंतचा पन्नास  वर्षांचा  प्रवास सांगितला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले  यांचे कार्य काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  त्याचप्रमाणे सावित्रीबाईंची ओवी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुजाता कातोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री .पांडुरंग कापरेयांनी केले. हा कार्यक्रम अतिशय  उत्तमपणे करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश