आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश


आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा  स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश



तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. 17 कोरोना महामारीनंतर प्रथमच डी.एड.च्या विद्यार्थ्यांच्या कला स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये कॉलेजच्या PPT या स्पर्धेत बाफना डी.एड. कॉलेजची विद्यार्थिनी  कु. प्रीती माटे हिने तृतीय क्रमांक आणि लोकनृत्य या  स्पर्धेत विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य हिरामण लंघे, प्रा.राजेंद्र डोके, प्रा.मनोज गायकवाड, प्रा.शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई , प्रा.योगेश जाधव, नंदकिशोर, सोमनाथ धोंगडे  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास