छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त
पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) ट्रेकिंग पलटन पुणे ग्रूप तर्फे सलग तिसऱ्या वर्षी शिव जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंहगडाची अतकरवाडी ते पुणे दरवाजा ही गडवाट प्लास्टिक मुक्त करण्यात आली.
ट्रेकिंग पलटन गृप ची एकूण ही ९६ वी मोहीम होती.
घोड्यांची पागा, दारूगोळा कोठार, पाण्याची टाकं, पुणे दरवाजा मार्गे उतरत अतकरवाडी पर्यंत ट्रेक करत गडवाट च्या दोन्ही बाजूंना उतारावर पर्यटकांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेय बाटल्या तसेच बिस्कीट, वेफर्स अशा कोरड्या खाऊचे पॅकेट्स गोळा करून पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या स्वाधीन केला. असा सुमारे सहा पोती पर्यावरणास घातक कचरा गोळा करण्यात आला.
ट्रेकिंग पलटन गृप च्या सदस्यांना कचरा गोळा करताना बघून काही पर्यटकांनी हातभार लावला. काहींनी आभार मानले. काहींनी कौतुक केले.
ट्रेकिंग पलटन गृप गेली सात वर्षे विविध गडावर अशा प्लास्टिक मुक्त अभियान राबवित आली आहे. सुदैवाने हळू हळू प्लास्टिक चे कचऱ्याचे प्रमाण कमी होत चाललेले दिसत आहे.
गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी गडवाट वरील प्लास्टिक कचरा उल्लेखनीय रित्या कमी आढळला. पर्यटकांमध्ये वाढत जाणारी ही जागरूकता छत्रपतींच्या गडकोट ना नक्कीच एक दिवस पूर्ण प्लास्टिक मुक्त करील अशी आशा ट्रेकिंग पलटन चे प्रा डॉ सुरेश इसावे यांनी व्यक्त केली.
या स्वच्छ्ता मोहिमेत ट्रेकिंग पलटन तर्फे संदीप चौधरी, आद्वैका चौधरी, अमोल गोरे, दशरथ पवार, डॉ. मिलिंद गायकवाड, शिवम गायकवाड, अजय खडके, महेश केंद्रे, श्वेता काकडे, सिद्धी पवार, प्रयाग जमाले, आकाश आगळे, गणेश तांबे, अंजू जाट, आणि डॉ. सुरेश इसावे यांनी योगदान दिले.
Comments
Post a Comment