व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजन
व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजन
लोणावळा (प्रतिनिधी) येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये गुरूवार दिनांक ०१/०६/२०२३ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक “चाकण ब्लड बँक” हे होते. या शिबीरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाला चाकण ब्लड बँककडून प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मानव अ. ठाकूर, सोबत डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. सोनी राघो, प्रा. मनिषा कचरे प्रा. प्राणेश चौव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment