विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त “वृक्षारोपण”
विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त “वृक्षारोपण”
लोणावळा (प्रतिनिधी) दि. 25 विद्या प्रसारिणी सभेचे व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, वाकसई, व्ही.पी.एस. इंग्लीश मेडीयम स्कुल, वाकसई, व्ही.पी.एस. कॉलेज आँफ फार्मसी, वाकसई. लोणावळा येथे दिनांक २५/०६/२०२३ रोजी विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त “वृक्षारोपण” करण्यात आले. यावेळी नियामक मंडळाच्या अध्यक्षा सौ. डॉ. मृणालीनी गरवारे मॅडम, तसेच कार्यवाह, डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह, श्री. विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य श्री. अरवांदभाई मेहता, श्री. डी. एच. सराफ, श्री. डॉ. एच. बी. निरगुडकर, श्री. भगवान आंबेकर,श्री. के. एस. भुरट, श्री. के. व्ही. कुलकर्णी, श्री. पी. बी. कुदळे, ॲड. संदीप अगरवाल, श्री. प्रेमोद कुदळे,शाला समाती सदस्य,श्री. धीरूभाई टेलर, श्री. राजेश मेहता, संस्था सभासद श्री. नितीन गरवारे, सौ. साधना कुदळे, सौ. विशाखा भुरके, सौ. पुजा भुरके हे सर्व उपस्थित होते. लोणावळ्यातील उद्योजक व समाजसेवक श्री. राजु खंडेलवाल यांनी महाविद्यालयाला 200 फळझाडे बक्षिस दिली. वृक्षारोपणाचे वेळी उद्योजक विकी पालरेचा हे देखील उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, मुख्याध्यापीका सौ. निशा नाईक तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment