प्रा.शशिकांत शिंदे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
प्रा.शशिकांत शिंदे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुणे (प्रतिनिधी) दि.०९ टीडीएफचे माजी शिक्षक आमदार स्व.शिवाजी दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्राध्यापक शशिकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण बेल्हे येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र टीडीएफचे कार्यवाह हिरालाल पगडाल, मुख्याध्यापक महामंडळाचे रावसाहेब आवारी, राज्य टीडीएफचे विश्वस्त के.एस.ढोमसे ,अमित बेनके, जुन्नर तालुका पं.समिती सदस्य सुवर्णा घोडके व उदय पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक शशिकांत शिंदे हे सुखसागर नगर येथील पै. हिरामण बनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये पंचवीस वर्ष ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आजवर त्यांना अनेक सामाजिक पक्षाचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा शाळेमध्ये नावलौकिक आहे. विद्यार्थी व शाळेच्या विकासासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. सध्या ते पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालय पीडीएफचे अध्यक्ष असून कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील अनेक समस्या शासन दरबारी मांडण्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे. तसेच त्यांनी अनेक शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी होऊन शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांची शाळा, परिवार यामध्ये आनंदाचे वातावरण असून याबद्दल संस्थापदाधिकारी, शाळेचे माजी प्राचार्य हरिचंद्र गायकवाड सर ,प्राचार्य मा. शिर्के सर तसेच सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवंड चे प्राध्यापक सुनील राजे निंबाळकर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पंधरा शिक्षक बंधू-भगिनींना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरांनी हा पुरस्कार टीडीएफ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी स्व.आमदार शिवाजी दादा पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे असे शिक्षकांबद्दल गौरव उद्गार त्यांनी काढले ळ.. यावेळी राज्य विश्वस्त के. एस.ढोमसे राज्य सचिव हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांनी आपले मनोगते व्यक्त केली. सदर पुरस्कार समारंभाचे आयोजन जुन्नर माध्यमिक शिक्षक संघ तसेच जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आलेले होते. यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा कार्यवाह पंकज घोलप , टीडीएफचे अध्यक्ष मुरलीधर मांजरे , कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष, प्राचार्य शिवाजीराव कामथे, महिलाध्यक्षा स्वाती उपार, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे सचिव, अरविंद मोडक, टीडीएफ चे उपाध्यक्ष , प्राचार्य राज मुजावर, बाबुराव दोडके, अशोक धालगडे संतराम इंदोरे व जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment