शिक्षकी पेशा नोकरी नसून एक व्रत आहे..... आमदार सत्यजित तांबे
शिक्षकी पेशा नोकरी नसून एक व्रत आहे..... आमदार सत्यजित तांबे
ओतूर (प्रतिनिधी) दि ०९ इतर व्यवसाय आणि शिक्षकी पेशा यामध्ये फरक असून शिक्षकी पेशा ही नोकरी नसून एक प्रकारचे व्रत आहे. शिक्षणासारख्या व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळणे हे पूर्व जन्माचे पुण्य आहे,"असे प्रतिपादन विधान परिषदेचे नाशिक पदवीधर संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी बेल्हे येथे एका कार्यक्रमात पुरस्कार वितरण प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक रावसाहेब आवारी होते.
स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षिका संघ यांचे संयुक्त विद्यमाने बेल्हे येथील वेद ओंकार मंगल कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रसंगी तांबे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की", शिक्षक व शिक्षक लोकशाही आघाडीमुळेच मी आमदार झालो. शिक्षक लोकशाही आघाडीचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षकांनी आपल्या मागण्या संघटनात्मक रित्या मांडाव्यात व आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याचा विसर पडू न देता विद्यादानाचे पवित्र काम करावे." तालुक्याचे युवा नेते अमित बेनके यावेळी म्हणाले की,"आजही समाजामध्ये शिक्षकांविषयी आदर आहे. हा आदर कायम राहण्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. शिक्षकांच्या कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुक्याचे आमदार अतुल बेनके नेहमीच प्रयत्नशील आहेत."
स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार टीडीएफ चे राज्याचे कार्याध्यक्ष जी के थोरात यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्यवाह हिरालाल पगडाल, समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, रयत शिक्षण संस्थेचे उदय पाटील,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के एस ढोमसे, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, बेल्हे चे सरपंच गोट्याभाऊ वाघ ,वसंतराव ताकवले, मुरलीधर मांजरे, सचिन दुर्गाडे,शिवाजीराव कामथे,पंकज घोलप, राजेंद्र पडवळ, रोहिदास वेठेकर,स्वाती उपार, तानाजी झेंडे, लक्ष्मणराव चतुर, विजय घोलप, संतोष सहाणे, सरिता आबक, कमल शिरोळे, शोभा तांबे, प्रदीप गाढवे, रवींद्र डुंबरे, रमेश ढोमसे, सविता ताजणे, मीरा डुंबरे, बी.जी. शिंदे, अशोकराव गोसावी, मंगेश डुंबरे,राजेंद्र सुतार,प्रशांत घुले, हनीफ शेख,ज्ञानेश्वर केंद्रे,रमेश मालुंजकर,इनामदार सर,संतोष कांबळे, राजश्री लोहोटे, रुपाली आवारी,निर्मला भोर,जयश्री कदम, सुरेश लांडे, रामदास डुंबरे, प्रदीप सूर्यवंशी, राजेंद्र गाडेकर,राजेंद्र पापडे, संदीप दातीर,प्रमोद मुळे सर्व तालुक्यांचे माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफ, माध्यमिक शिक्षिका संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जी.के. थोरात,
हिरालाल पगडाल, उदय पाटील, रावसाहेब आवारी यांनीही मनोगत व्यक्त केली.इतर 15 पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवले गेले. जिल्हास्तरीय पुरस्कारार्थी
1)नंदकुमार लंगडे 2)अशोक दरेकर 3)अशोक आवारी 4)शशिकांत शिंदे 5)वर्षां देसाई 6)नितीन रांजणे 7)विठ्ठल ठोंबरे 8)अनिल भालेकर 9)संजय भोसले 10)रावसाहेब वाघ 11)संतोष जाधव 12)हनुमंत बरबोले 13)सुनील राजेंनिंबाळकर 14)श्रीरंग रावळेकर 15)दत्तात्रय अरकडे
कार्यक्रमाचे प्रस्ताविक के एस ढोमसे यांनी केले. भाऊसाहेब खाडे यांनी सूत्रसंचालन केले तर सरिता आबक यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment