भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पेनुर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पेनुर येथे  भव्य रक्तदान  शिबिर संपन्न



(प्रतिनिधी) दि २५ भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 21/08/2023 रोजी पेनुर येथे  भव्य रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पो. नि. श्री. संभाजीराजे गायकवाड, डॉ. स्वामी गुरुजी, अक्षय ब्लड बँकेचे प्रतिनिधी श्री. सागर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 

          


मागील 20 वर्षापासून या संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. सालाबाद प्रमाणे संस्थेने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास यावर्षीही पेनुर व पेनुर परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सहभाग नोंदवला. यावर्षी संस्थेने केलेल्या आव्हानास 161 रक्तदात्यांनी रक्तदान करुन भरभरून प्रतिसाद दिला. यातील गौरवपूर्ण बाब म्हणजे 5 जोडप्यांनीही रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. या सर्व रक्तदात्यांचा उचित असा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.

        सदर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. बाळासाहेब चवरे, श्री. महावीर शेटे, श्री. समाधान गायकवाड, श्री. शहाजहान मुजावर, श्री. अरुण माने, श्री. सतीश अनंतकर, श्री. सज्जन गवळी, श्री. दत्तात्रय शेंबडे, श्री. समाधान गवळी, श्री. स्वप्निल माडकर, डॉ. शुभम स्वामी, श्री. किशोर गवळी, श्री . संजय माने व संस्थेचे सर्व सभासद व ज्ञात-अज्ञात बांधवांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या शेवटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संभाजी राजे गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश