विकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या टीमचे विमा व्यवसायात उत्तुंग यश

 विकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या टीमचे विमा व्यवसायात उत्तुंग यश



तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि १६ एल आय सी कार्यालय  तळेगांव दाभाडे येथे कार्यरत असणारे प्रतिथयश विकास अधिकारी (वर्ग 2) श्री शिवाजी पाटील ह्यांच्या टीमची युनिट मिटिंग दिनांक 16 ऑगस्ट ला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.गेल्या आर्थिक वर्षात शिवाजी पाटील ह्यांच्या टीमने लोनावळा-तळेगांव शाखेमध्ये सर्वात प्रथम सहस्त्रविर विकास अधिकारी होण्याचा मान मिळवला असून शाखेमध्ये बऱ्याच वर्षानंतर ही किमया साधल्या गेली आहे.तसेच श्री शिवाजी पाटील ह्यांना उत्तम कामगिरी च्या जोरावर एल आय सी ने एस बि ए ही मानाची पदवी दिली आहे.

शिवाजी पाटील ह्यांनी प्रशिक्षित केलेल्या एजंट्सपैकी पाच एजंट्सनी ,एकूण आठ वेळा ते ही गेल्या तीन च वर्षात आतंरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणारा MDRT हा किताब जिंकलेला आहे.त्याकरिता विकास अधिकारी श्री शिवाजी पाटील आणि त्यांच्या टीमचे विमा क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे.

ह्या सर्व बाबींचे एकत्रित यश साजरे करण्यासाठी आणि पुढील व्यवसायाचे नियोजन करण्यासाठी लोनावळा शाखेचे शाखाधिकारी श्री बेडसे साहेब आणि तळेगांव चे शाखाधिकारी श्री पुरोहित साहेबांनी ह्या वेळी सर्वांना मार्गदर्शन आणि कौतुक केले.तसेच नवीन एजंट्सचे स्वागत करायला आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी श्री अनिकेतजी वैद्य विशेषत्वाने उपस्थित होते.

दहावी -बारावी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले तरुण-तरुणी ,गृहिणी,विविध प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारे ,पतसंस्थेतील कर्मचारी किंवा इतर कोणीही ज्यांना  जनसंपर्काची आवड आहे आणि चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याची ईच्छा आहे ,ज्यांना धडपड करुन स्वताची,कुटुंबियांची स्वप्न पुर्ण करण्याची ईच्छा आहे ,त्यांना कोणत्याही गुंतवणूकीशिवाय एक जबरदस्त सरकारी व्यवसायाची संधी मावळातून 50 जणांना देण्याचे सुतोवाच श्री शिवाजी पाटील ह्यांनी केले असून अधिक माहिती साठी भ्रमणध्वनी क्रमांक 9850257030 किंवा 9766881108 वर संपर्क साधण्याचे आवाहन श्री पाटील ह्यांनी ह्या प्रसंगी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश