इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज मध्ये डीएड डिग्री घेणाऱ्या मुलींना टीचर ट्रेनिंग संपन्न
इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज मध्ये डीएड डिग्री घेणाऱ्या मुलींना टीचर ट्रेनिंग संपन्न
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) दि. २३ ऑगस्ट, इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेने आजच्या विद्याथ्यांसमोरील नवनवीन आव्हानांना शिक्षकांनी कसे तोंड द्यावे या विषयाला अनुसरून हा परिसंवाद प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी घडवून आणला. कॉलेजचे प्रिंसिपल हिरामण लंघे सरांनी या परिसंवाद साधण्यास मान्यता दिली. यावेळी बाफना कॉलेजच्या शीतल गवई, शुभांगी हेंद्रे या शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी प्रेसिडेंट संध्या थोरात, सेक्रेटरी निशा पवार प्रकल्प प्रमुख डॉ विनया केसकर तसेच माजी प्रेसिडेंट प्रवीण साठे, सभासद् कोमल सूर्यवंशी यांचा सत्कार केला.
डॉ. विनया केसकर यांनी D.Ed कॉलेजच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना अगदी मूलभूत प्रश्नांना हात घालून त्यांना बोलते केले. अगदी KG to PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात, त्यांच्यासमोर काय आव्हाने आहेत? या विद्यार्थ्यांना आपण कशी मदत करू शकतो? यावर उहापोह केला. मुलांमध्ये होणारे हार्मोनल बदल, त्यांच्या मेंदूची वाढ, वैचारिक क्षमता, भावनात्मक अनुभव आदी गोष्टी समजून घेऊन विद्यार्थी सक्षम कसा होईल यावर भर दिला पाहिजे असे समजावून सांगितले. शाळेच्या वर्गातील वातावरण कसे तणावमुक्त राहील, विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद कसा साधायचा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, मुले मोहाला बळी पडू नयेत म्हणून यासाठी कशी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता त्यांचा आत्मसन्मान जपावा असा मोलाचा सल्लाही दिला.
प्रेसिडेंट संध्या थोरात याच कॉलेजच्या माजी विद्यार्थीनी असून, इथे डिग्री घेऊन त्यांनी जॉबही केला असल्याचे उपस्थितांना सांगितले. विद्यार्थिनींच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी म्हणून या प्रशिक्षणाचे आयोजन इनरव्हील क्लब तर्फे केल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.शुभांगी हेंद्रे मॅडमनी या मार्गदर्शक परिसंवादाबद्दल डॉ विनया केसकर आणि प्रेसिडेंट संध्या थोरात आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेचे आभार मानले.
Comments
Post a Comment