डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न



तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दिं. १८
सहकारी पतसंस्थेच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते, या सभेत मागील वर्षातील आर्थिक ताळेबंद सादर करण्यात आला व नवीन आर्थिक वर्षातील ताळेबंदास मजुरी देण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या वतीने मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार हा मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे यांना, श्री डोळसनाथ महाराज सहकार भूषण पुरस्कार नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांना, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार दिलीप शहा यांना, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार यादवेंद्र खळदे यांना, पुरस्कार रणजीत रामदास काकडे यांना, सांप्रदायिक क्षेत्र पुरस्कार कीर्तनकार सुरेश साखळकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या ओंकार चंद्रकांत भेगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बबनराव भेगडे, गणेश काकडे, सुरेश धोत्रे, रवींद्र पाटील, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते, जनार्धन रणदिवे , सुभाषराव जाधव, संतोष मुऱ्हे , विशाल तुळवे, सुरेश गायकवाड , शरद भोंगाडे, समीर भेगडे, राकेश खळदे, पीएमआरडीए सदस्य व माजी नगरसेवक संतोष भेगडे पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल राऊत व प्रवीण मुऱ्हे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश