पुणे शहर टीडीएफचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
पुणे शहर टीडीएफचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर: 17 सप्टेंबर रोजी होणार वितरण
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) दि. 14 पुणे शहर टी.डी.एफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सन 2023 - 24 चे शिक्षक पुरस्कार टीडीएफने जाहीर केले असून शहरातील चार शिक्षकांना विशेष सन्मान,15 मुख्याध्यापक,07 कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,30 माध्यमिक शिक्षक तर 2 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा नानासाहेब बोरस्ते माजी शिक्षक आमदार नाशिक विभाग मतदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, रवींद्र धंगेकर, आमदार कसबा विधानसभा, मा.संभाजी झेंडे माजी सनदी अधिकारी यांच्या हस्ते व के.जे.जाधव संस्थापक के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, हिरालाल पगडाल, कार्यवाह महाराष्ट्र टीडीएफ जी.के. थोरात कार्याध्यक्ष महाराष्ट्र टीडीएफ, मा. कृष्णकांत चौधरी, उपशिक्षण अधिकारी जि. ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पिसोळी, कोंढवा - सासवड रोड पुणे- 48 येथे रविवार दिनांक17 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न होणार आहे असे पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे, सचिव संतोष थोरात,माध्य.अध्यक्ष सचिन दुर्गाडे व ज्युनि.काॅलेज अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment