महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील कंत्राटी आणि कंपनीकरणाविरुद्ध तीव्र लढा उभारणार: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

 महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील कंत्राटी आणि कंपनीकरणाविरुद्ध तीव्र लढा उभारणार: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

पुणे 23 सप्टेंबर 2023



महाराष्ट्र मध्ये शिक्षण क्षेत्राची वाहतात झाली असून शासनाच्या कंत्राटीकरण व कंपनी करणा विरोधात तीव्र लढा उभारण्याचे आवाहन नाशिक विभाग पदवीधर  संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. पुण्यामध्ये एस एम जोशी सभागृह, गांजवे चौक नवी पेठ या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रातील केलेल्या वेगवेगळ्या बदल व धोरणांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी  सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 40 ते 42 संघटनांचे प्रतिनिधी स सहभागी झाले होते.  यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य टीडीएफ ,माध्यमिक शिक्षक संघ, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, छात्र भारती, जुनी पेन्शन समिती ,नॅशनल स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, ऍक्टिव्ह टीचर फोरम अशा प्रकारच्या संघटनांचा समावेश होता. शासनाचा पूर्णपणे शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव असल्याचे मत सर्वांनी व्यक्त करून समन्वय समितीच्या माध्यमातून या विरोधात मोठा लढा उभा करण्याचे मत व्यक्त केले.

 विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आजगाव सर यांनी शासनाच्या खाजगीकरण समूह शाळा, शाळा दत्तक योजना, कंपनी कारणाविरुद्ध तीव्र लढा उभारण्यासाठी  सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच सर्व संघटनांनी एकत्र येऊन शासनाविरुद्ध आवाज उठून ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत, नाशिक विभागाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, टीडीएफ चे महासचिव हिरालाल पगडाल  सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, आपचे सुभाष वारे, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष  वैद्य सर, महेंद्र गणपुले, गीता महाशब्दे, प्राथमिकचे उदय शिंदे, नवनाथ गेंड, मुकुंद किर्दक, शरद जावडेकर या सर्वांनीच आपल्या मनोगत मधून शासनाच्या धोरणाविषयी तीव्र निषेध नोंदवून, समूह शाळा योजना, शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटी करून, शाळा दत्तक योजना, कंपनीकरण अशा प्रकारची शासनाची ही सर्व धोरणे आरटीई कायद्याला हरताळ फासणारी असून शिक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी, ही धोरणे हाणून पाडण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून शासनावर तसेच शैक्षणिक क्षेत्रातल्या केलेल्या बदलावर कडाडून टीका केली.

यावेळी प्रामुख्याने या चळवळीमध्ये विद्यार्थी पालक यांना सहभागी करून घेणे, सर्व घटकांना त्याला सहभागी करून घेणे ,तसेच सर्व संघटनांनी एकत्र मिळून मा. मुख्यमंत्री शिक्षण मंत्री , शिक्षण सचिव, सर्व जिल्हाधिकारी,आयुक्त, शिक्षण संचालक यांना निवेदन देणे, ग्रामसभांच्या माध्यमातून या विरुद्ध आवाज उठवून ग्रामसभेमध्ये याच्या विरोधात ठराव करू

न घेणे, तसेच येत्या आठ दिवसांमध्ये प्रत्येक जिल्हास्तरावर मोठे आंदोलन उभे करण्याचे ठराव पारित करण्यात आले.

    सदर बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे निमंत्रक शिवाजीराव खांडेकर, भाऊसाहेब चासकर, मधुकर काठोळे यांनी केले होते. प्रास्ताविक निमंत्रक भाऊसाहेब चासकर यांनी केले तर सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनेचे शिवाजी खांडेकर यांनी केले व  आभार पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी मानले.

 यावेळी राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने संदीप जगताप, पुणे शहरांमधून प्राचार्य शिवाजीराव कामथे, विजयराव कचरे, प्रा. शशिकांत शिंदे, प्रा. संतोष थोरात, डॉ.मंगल शिंदे, हर्षा पिसाळ, संजय कांबळे तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश