मावळातील पाच शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

 मावळातील पाच शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

तळेगाव स्टेशन (वार्ताहर)  दिनांक 25 पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा 2023 बारामती येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हास्तरीय विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथील प्रा.डॉ.संदीप गाडेकर यांना देण्यात आला. 



जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे भैरवनाथ विद्यालय घोणशेत येथील श्री. नारायण धोंडीबा पवार यांना देण्यात आला. जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार  श्री.मंडलिक सुनिल जनार्दन,( सहशिक्षक ) प्रतिक विद्यानिकेतन, निगडे., श्री.शांतीलाल उध्दवराव घुमरे, (सहशिक्षक), डॉ. बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालय, लोणावळा. ,सौ.रूचिरा मकरंद बासरकर  (सहशिक्षिका) ,रामभाऊ परूळेकर विद्यानिकेत ,तळेगांव दाभाडे  यांना  देण्यात आला. पुरस्काराचे वितरण महा.राज्य टिडीएफ चे कार्याध्यक्ष जी.के थोरात, विश्वस्त के.एस. ढोमसे, संभाजी होळकर संचालक पी.डी.सी. बँक पुणे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, कार्यवाह पंकज घोलप,राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे, टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, जिल्हा माध्यमिक महिला शिक्षक संघाच्या अध्यक्षा स्वातीताई उपार, उपाध्यक्ष स्नेहलता बाळसराफ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,  प्राचार्य शिवाजीराव कामथे, सुधाकर जगदाळे, सचिन दुर्गाडे, प्रा.संतोष थोरात, राज मुजावर, शशिकांत शिंदे, विजयराव कचरे, अशोक धालगडे, संतराम इंदुरे, भारती राऊत, हर्षा पिसाळ  यांच्या हस्ते झाले. 

यावेळी मावळ तालुक्यातील स्नेहल दत्तात्रय बाळसराफ , ( राज्य प्रतिनिधी व जिल्हा उपाध्यक्षा ) अशोक  शामराव धनोकार ,( तालुका प्रतिनिधी व तालुका अध्यक्ष )  राधाकृष्ण भाऊ येणारे ,(अध्यक्ष) मावळ तालुका शिक्षक लोकशाही आघाडी व मावळ तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश