अन्यायकारक धोरणाच्या विरोधात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा विराट मोर्चा

 अन्यायकारक धोरणाच्या विरोधात शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा विराट मोर्चा



पुणे (प्रतिनिधी) दि. १३

शिक्षण हक्क बचाव कृती समिती पुणे जिल्हा, पुणे शहर/ जिल्हा टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघ तसेच जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांनी समूह शाळा योजना  शाळा दत्तक योजना तसेच नोकऱ्यांचे कंत्राटीकरणा या शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय असा विराट मोर्चा काढला होता या मोर्चाला जिल्ह्यातून जवळपास चार ते पाच हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते . यावेळी शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय हा परिसर शिक्षकांनी घोषणांनी दणाणून सोडला. हा मोर्चा यशस्वी झाल्याचे मत समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर, टीडीएफचे विश्वस्त के. एस. ढोमसे,राज्य कार्याध्यक्ष जी.के.थोरात, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, संचिन दुर्गाडे ,प्रा.शशिकांत शिंदे व पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष संतोष थोरात यांनी सांगितले.



 सदर मोर्च्याची सुरुवात महात्मा फुल्यांनी ज्या भिडे  वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या वाड्याला टीडीएफ च्या वतीने पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून  करण्यात आली. या मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात लोकप्रतिनिधी सहभागी होऊन मोर्चाला मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने कर्जत जामखेड चे आमदार रोहित  पवार, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर ,शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मोहन दादा जोशी, नाशिक विभाग पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार गव्हाणे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर या सर्वांनी सदर शासन निर्णय हे शिक्षण क्षेत्र उध्वस्त करणारे  असून भविष्यकाळामध्ये शिक्षण क्षेत्राची खूप मोठी हानी या निर्णयामुळे होणार असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. मुणगेकर यांनी सदर निर्णय हे आरटीई कायद्याला हरताळ फासणारे  असून शासन बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आणत आहे असे मत व्यक्त केले. यावेळी सर्वांनीच या निर्णयाविरोधात एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर शासन निर्णय तात्काळ रद्द केले नाही तर भविष्यात शासनाविरुद्ध मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मनोगतामध्ये दिला.या वेळी टीडीएफ च्या वतीने राज्य विश्वस्त के.एस. ढोमसे यांनी मनोगत व्यक्त केले.

 मोर्चाचे नियोजन सूत्रसंचालन पुणे जिल्हा शिक्षण हक्क बचाव कृती समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी मानले.

विशेष म्हणजे या मोर्चामध्ये प्रा. सचिन दुर्गाडे यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा तसेच अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशातील भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

   नंतर सर्व शासकीय आदेशांची होळी करण्यात आली तसेच हे शासकीय आदेश रद्द करण्याबाबतचे नियोजन शिक्षण आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.

  यावेळी राज्य टीडीएफचे विश्वस्त के. एस. ढोमसे अध्यक्ष जी.के. थोरात जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, जिल्हाध्यक्ष मुरलीधर मांजरे, जिल्हा सचिव पंकज घोलप, महिला अध्यक्षा स्वाती उपार, पुणे शहराध्यक्ष संतोष थोरात,टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे, प्रा.सचिन दुर्गाडे, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर,अरविंद मोडक, महिला अध्यक्षा हर्षा पिसाळ, सचिव डॉ. मंगल शिंदे, भारती राऊत , भगवान पांडेकर, अशोक धालगडे, तसेच जिल्ह्यातील टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश