देशात समता प्रस्थापित होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा- डॉ.राजाभाऊ भैलुमे

 देशात समता प्रस्थापित होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा- डॉ.राजाभाऊ भैलुमे



तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि.२३

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुणे व श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालय वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती' या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. अशोक बाफना, प्रमुख वक्ते श्री. राजाभाऊ भैलूमे, प्रमूख पाहुणे श्री. संभाजी मलघे आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे  प्रमखु श्री. मनोहर जाधव व प्राचार्य श्री. अशोक गायकवाड सर यांच्या हस्ते विशेष परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. देशात समता प्रस्थापित होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजाभाऊ भैलूमे यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेचे सचिव श्री. अशोक बाफना यांनी संविधानाचा अभ्यास करणे खऱ्या अर्थाने काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांसाठी विविध संधी उपलब्ध करून दिले जातात याबद्दल विशेष कौतुक इंद्रायनी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संभाजी मलघे सर यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांनी अध्यासनाची भुमिका मांडली. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अशोक गायकवाड सर यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले.

                यावेळी प्रा. महादेव वाघमारे, डॉ. शीतल दुर्गाडे, प्रा. संतोष शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. परिसंवादाचे आभार प्रा. शीतल शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी केले या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश