इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्याकडून भैरवनाथ विद्यालयास शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी मदत

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्याकडून भैरवनाथ विद्यालयास शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी मदत


तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) दि. २८

घोणशेत ता. मावळ येथील श्री  संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या   भैरवनाथ माध्यमिक विद्यालयास   इनरव्हील क्लब निगडी प्राईड यांच्या वतीने  'हॅप्पी  स्कूल  उपक्रम 2023-24 अंतर्गत शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी मदत करण्यात  आली. " या मदतीचा अनावरण व कृतज्ञता समारंभ विद्यालयात पार पडला .या कार्यक्रमाचे  उदघाटन  क्लबच्या जिल्हाध्यक्षा  मुक्ताताई  पानसे  , अध्यक्षा  डॉ. रंजनाताई  कदम यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी क्लबच्या सचिव सोनालीताई  जयंत ,माजी अध्यक्षा  अँड. प्रतिभाताई जोशी (दलाल) व  संस्थेचे सचिव अशोकजी बाफना, अध्यक्ष  तुकाराम असवले , उपाध्यक्ष  बंडोपंत मालपोटे , संचालक पी. वाय्. जांभूळकर, दत्ता भाऊ असवले, राजू खांडभोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


या उपक्रमाअंतर्गत विद्यालयास प्रयोगशाळा टेबल, प्रयोग साहित्य,  खेळ साहित्य, हॅन्ड वाॅश स्टेशन, ग्रीन फळे, ऑफिस कपाटे व टेबल इत्यादी  साहित्याची मदत सुपूर्द करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत दिलेल्या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्तावाढीसाठी करावा असे आवाहन केले. क्लबच्या माध्यमातून या शाळेस ही मदत उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्र कांडेकर,अंबादास गर्जे या शिक्षकांचेही सहकार्य लाभले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण पवार यांनी  केले. सूत्रसंचालन सुनिता शेरे यांनी तर सुनंदा कडूसकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनींनी नृत्य  सादर करून ईशस्तवन सादर केले. आभार कामिनी चोरघे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची  सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामनाथ असवले ,कैलास असवले यांनी संयोजनासाठी सहकार्य केले.


इनरव्हील क्लब निगडी प्राईड यांनी केलेल्या  सहकार्याबद्दल संस्थेचे सचिव श्री अशोक बाफना यांनी इनरव्हील क्लब निगडी प्राईड चे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश