विद्यार्थ्यांनो करिअरच्या नविन वाटा निवडा -श्री.अशोकजी बाफना


 विद्यार्थ्यांनो करिअरच्या नविन वाटा निवडा -श्री.अशोकजी बाफना


तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. २९ अध्यापक महाविदयालय वडगाव मावळ येथे बीएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा Induction Program संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सचिव श्री.अशोकजी बाफना यांनी विदयार्थ्याना मेलाचा सल्ला दिला. नोकरी नसेल तर स्वताच्या वेगळया वाटा निवडा त्यासाठी नवनविन तंत्रज्ञानाचा उपयोग करा असे सांगीतले.

यावेळी युवा नेते राज खांडभोर यांनी विदयार्थ्याना संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.तुकारामजी असवले, ह. रा. बाफना कॅालेजचे प्राचार्य हिरामण लंघे , कला वाणिज्य महाविदयालयाचे प्र.प्राचार्य अशोक गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रम चे प्रास्ताविक महाविदयालयाच्या प्राचार्या डॅा.अनिता धायगुडे यांनी केले. डॅा.कविता तोटे व प्रा.सोनाली पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

महाविदयालयातील प्रा.सांगळे महादेव, डॉ. संदीप गाडेकर , डॅा.शीतल देवळालकर , प्रा.ज्योती रणदिवे , प्रा.जाधव सुजाता , घोजगे सर व कडू सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री.सोमनाथ धोंगडे , श्री,विनायक येळवंडे व श्री संतोष ढमाले यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास