सूक्ष्मजीवांचा अभ्यास म्हणजे भविष्याच्या प्रगतीचा मार्ग – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक सूक्ष्मजीव दिन साजरा

तळेगाव दाभाडे दि. १७ (प्रतिनिधी) : “सूक्ष्मजीवांचा अभ्यास म्हणजे भविष्याच्या प्रगतीचा मार्ग आहे. अन्न उत्पादन, कृषी व औषधनिर्मिती या सर्व क्षेत्रांमध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भविष्यात या शास्त्राचे संशोधन विद्यार्थ्यांसाठी नवे दालन खुले करणार आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.


१७ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक सूक्ष्मजीव दिनानिमित्ताने इंद्रायणी महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागामार्फत “मायक्रो वंडर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तृतीय वर्ष बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने अन्न उत्पादन, कृषी, औषधनिर्मिती यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्मजीवांचे विविध नमुने व त्यांच्यापासून तयार करण्यात आलेली उत्पादने यांचे आकर्षक प्रदर्शन भरवले. तसेच “मायक्रो-कार्टून” या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी सूक्ष्मजीवांवर व्यंगचित्रे व रेखाचित्रे साकारली.


या प्रसंगी डॉ. मलघे यांनी महाविद्यालयात लवकरच मायक्रोबायोलॉजी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी वरिष्ठ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. रोहित नागलगाव यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थी व कार्यक्रम समन्वयक यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमात कनिष्ठ विज्ञान विभागातील २०० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून सूक्ष्मजीवांविषयीची माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाचे समन्वयक सौ. विद्या पाईकराव यांनी सूत्रसंचालन केले, तर सौ. गितांजली पानसरे यांनी आभार मानले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा