वाचा आणि थंड बसा - श्री. अशोक देवकते

 वाचा आणि थंड बसा -   श्री. अशोक देवकते


  पुणे दि.१९ (संपादक डॉ.संदीप गाडेकर) 

खाजगीकरण कंत्राटीकरण शाळा दत्तक योजना अशोकाच्या झाडासारखी ना फळ ना फुल अशी वांझोटी शिक्षण व्यवस्था पर्यायाने सर्वसामान्यांसाठी बलशाली राष्ट्रासाठी आत्मघातकी ठरेल.

       Z. P. शाळेतील स्थगिती गळती रोखून सर्वोत्तम भौतिक सोयी सुविधा सह पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणाच्या मांडलेल्या थाटलेल्या बाजारात वाबळेवाडी पॅटर्न आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण झेडपी शाळा  डंके की चोट पर NEET, JEE फाउंडेशन कोर्स बहुभाषिक शिक्षण देते तेही मोफत. ते झेडपी आदर्श मॉडेल घेऊन सर्वत्र अंमल करण्याऐवजी झेडपी शाळेचे  कंपनीकरण कंत्राटीकरण दत्तक शाळा योजना करून नफेखोर मुठभर लोकांच्या घशात शाळा घालून कुठे नेऊन ठेवणार ही शिक्षण व्यवस्था? 

        कोरोना महामारी मध्ये कल्पनेच्या पलीकडे शाळा बंद शिक्षण चालू असा अलौकिक उपक्रम राबविला मात्र आता शाळा आहे पण शिक्षण नाही झेडपीच्या शाळेत नैसर्गिक वाढ वर्ग परवाने कोमात ?

 दारू दुकान परवाने जोमात? शाळा बंद दारू चालू? 

मायबाप सरकार करना क्या चाहते हो? 

   देश पारतंत्र्याच्या विळख्यातून बाहेर येतो हजारो संकटाला पायदळी तुडवून परकीयाच्या कुचुंबनेच्या अवहेलनेच्या छाताडावर बसून थैया थैया नाचून  IIT ISRO AIMS मिलिटरी स्कूल सैनिकी स्कूल नवोदय स्कूल आयटीआय  NDA ICCR DRDO अशा जागतिक दर्जाच्या संस्था स्थापन करून देशाला जगाच्या नकाशावर सर्वोत्तम मजबूत स्थान निर्माण करतो वर्तमानात आर्थिक स्थैर्य मजबूत सर्व क्षेत्रीय भक्कम असताना भारताला सर्वोत्तम असा निसर्गाचा ठेवा व परंपरागत मिळालेल्या  बुद्धिवादी लोकांचा वसा आणि वारसा अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची जोड हजारो कोटीचा जमा होणारा टॅक्स असे असताना सुद्धा सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार कौशल्यपूर्ण KG ते PG पर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत शिक्षण गरजायुक्त भौतिक सोयी सुविधा सह पोषक वातावरण देण्यास शासन प्रशासन कुचकामी हतबल ठरले आहे का? 

           शासकीय शाळा तथा शासकीय संस्था राष्ट्राच्या राज्याच्या उत्पन्नाचे साधन नाही ते कष्टकरी शेतकरी पीडित वंचित शोषितांच्या मुलांना राष्ट्राच्या पर्यायाने सर्वांगीण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केंद्र आहे हे विसरून चालणार नाही.

       समाजातील बुद्धीजीवी लोकांनी शिक्षण व्यवस्थेवर सकारात्मक दबाव निर्माण करून शिक्षण व्यवस्थेचा कणा मोडणार नाही पर्यायाने सर्व क्षेत्रीय विषमतेचे बीज पेरले जाणार नाही याची दखल घ्यायला हवी अन्यथा आर्थिक सामाजिक शैक्षणिक व्यवस्था कोलमडेल आणि अति महत्त्वाकांक्षी  सत्तापीपासू राजकीय घराणेशाहीच्या आणि मुठभर भांडवलशाहीच्या पगड्यामुळे देश पुन्हा वैचारिक सामाजिक आर्थिक गुलामगिरीकडे वाटचाल करेल की काय अशी भीती भेडसावते आणि महागाई बेरोजगारीचे भूत सर्वसामान्यांच्या मानगुटीवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसेल हे नाकारून चालणार नाही.

        राजकीय प्रस्थापित व्यवस्थेचे कामकाज कन्स्ट्रक्टिव्ह सिस्टम प्रमाणे चालते मग शासकीय संस्था बिमारू अवस्थेत कशा काय? यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे? 

             शाळा आहे पण शिक्षण नाही रुग्णालय आहे पण औषध नाही पेशंट आहे पण डॉक्टर नाही विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत या मायबाप सरकारला शासकीय यंत्रणा संस्था  मोडखळीस आणण्याचा जणू काही कावीळच झाला आहे की काय? सरकारी आरोग्य संशोधन संस्था बँका कारखाने दूध संस्था दिवाळीखोरीस येतात व बंद पडतात. आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या बँका दूध संस्था आरोग्य औषधी संशोधन संस्था ISO मानांकित? एवढा विरोध विरोधाभास कसं काय जमतं? यांच्या व्यवस्थापनाकडे रॉकेट सायन्स आहे की काय? देशातील नागरिकांना आर्थिक भत्ते फुकट का? आणि कशासाठी? देशातील आणि राज्यातील नागरिकांना सर्व काही फुकट योजना देऊन व्यसनाधीन व अकार्यक्षम आळशी बनवत तर नाही ना?

देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्ष अभिमानाने व स्वाभिमानाने जल्लोषात साजरा केला आमची छाती अभिमानाने फुगून 56 इंच झाली.  काही  गावाने स्वातंत्र्याची 75 वर्षे पाहिली परंतु त्यांनी कधी लालपरी पाहिली नाही शिवाय त्यांच्या अंधारमय झोपडीत प्रकाशाच्या वाटा पोहोचल्या नाहीत की शिक्षणाची गंगा. डोंगरदरी नदी ओढ्यातून स्वतःच्या अस्तित्वाची वाट शोधून कष्टकरी शेतकरी वंचित पीडितांची मुले देशातील  सपनईक्या घरफोड्या लाकूडतोड्या आगलाव्यांच्या अनेक गोष्टी ऐकून प्रेरित होऊन आता कुठेतरी शिकून सवरुनी स्वप्नाला पंख देऊन उंच भरारी घेऊन मोठा  सायब होण्याची स्वप्न बघत असतानाच शासकीय नोकरीची प्रशासनाची दरवाजे बंद करून मुख्य प्रवाहात येण्याचे दोरच  कापण्याचे मनसुबे चालवले ? हा कसला करिष्मा  ? सीएसआर च्या नावाखाली शिक्षणाचा खेळखंडोबा लावलाय? 

             कॅन्सरची वाळवी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचली आहे संपूर्ण देश कॅन्सरमय  आणि भ्रष्टाचार रुपी अजगर देशातील सिस्टम पोखरली  असताना मायबाप सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?ऑनलाइन परीक्षा घोटाळे नोकर भरती रोस्टर घोटाळे करून गोरगरिबांच्या नोकऱ्या पळविणाऱ्या टोळीचा वरदहस्त असणारी दलाल यंत्रणा नफेखोर प्रशासनाच्या व दलालच्या आडून प्रस्थापित विस्थापिताच्या बोकांडी बसून स्वतःची पोळी भाजून घ्यायला मोकळे नाही का? 

         वन नेशन वन रेशन

         वन नेशन वन पेन्शन

          वन नेशन वन इलेक्शन

          वन नेशन वन टॅक्स

अशा क्रांतिकारी धोरणात्मक निर्णय राबवण्याचा संकल्प हाती घेतानाच  वन नेशन वन एज्युकेशन अशा क्रांतिकारी एज्युकेशन सिस्टमचे राष्ट्रीयकरण करण्याऐवजी कंत्राटीकरण कंपनीकरण कशासाठी? पेन्शन वाढ श्रेयवाद आणि जाहिरात बाजी च्या लढाईत हजारो कोटी उधळण्यात दंग असणाऱ्या मायबाप सरकार ज्या मतदाराच्या मतशक्तीतून विधिमंडळात आणि संसदेत  नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधी ज्या मतदाराच्या मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांना  अध्यापना व्यतिरिक्त  शालाबाह्य तथा ऑनलाईन  अतिरिक्त कामातून मुक्त कराल का? अन गोरगरिबांच्या मुलांना  वाड्या- वस्त्यातील शाळेत जाऊन मुलांना आयुष्याची बाराखडी शिकवू गिरवू देण्यासाठी झेडपी शाळेचे अस्तित्व ठेवाल का?   शिक्षण हे जनतेच्या हक्काचे असून हुकूमशाही वृत्तीने निर्णय घेऊन मायबाप सरकार जनतेच्या असंतोषाचे जनक होऊ नये. ......

✍️✍️

श्री. अशोक देवकते.   

नूतन माध्यमिक विद्यालय केशवनगर, मुंढवा, पुणे-36

 संपर्क- 7083543013

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश