प्रा. मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान

 प्रा. मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान  

तळेगाव स्टेशन दि. ९  प्राध्यापक मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडून नुकतीच पी.एचडी. प्रदान करण्यात आली. लोणावळा येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात मल्हारी नागटिळक हे सहाय्यक प्राध्यापक या पदावर बारा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी मानवी शरीरातील रक्तामध्ये असलेल्या सिरम अल्बमिन नावाच्या प्रथिनांवर संभाव्य घातक कीटकनाशकांचा काय परिणाम होतो याचा स्पेक्ट्रोस्टॉपिक आणि मॉलिक्युलर डॉकिंग टेक्निक चा वापर करून त्याच्याविषयी सखोल अभ्यास केला आहे व ह्या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठात शोधनिबंध सादर केला आहे. नागटिळक यांनी त्यांच्या पी.एचडी. दरम्यान दोन पेपर प्रकाशन, एक पुस्तक प्रकाशन व सहा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला. यासाठी त्यांना औंध, सातारा कॉलेज येथील प्राचार्य डॉ. शकुंतला सावंत मॅडम व एस. एम. जोशी कॉलेज मधील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. रंजना जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल त्यांना एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड व लोणावळा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राध्यापक धनराज पाटील, संदीप लबडे, खाडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी डॉ. मल्हारी नागटिळक म्हणाले, मिळालेली पदवी ही माझी नसून माझ्या जडणघडणीतील प्रत्येक व्यक्तीची आहे. तसेच त्यांचा हा श्री ते डॉ. प्रवास एका झोपडपट्टी मधून ते सरकारी नोकरीपर्यंत हा अत्यंत हलाखीचा, मेहनतीचा, चिकाटीचा व जिद्दीचा होता. आगामी काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अनेक संशोधन करण्याचा त्यांचा मानस आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश