किशोर भाऊंचे जाणे म्हणजे मावळ तालुक्याची मोठी हानी : ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ

 किशोर भाऊंचे जाणे म्हणजे मावळ तालुक्याची मोठी हानी : ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ 

किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ यांचे प्रवचन संपन्न

तळेगाव दाभाडे, (डॉ.संदीप गाडेकर)

किशोर आवारे यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील योगदान न विसरता येण्यासारखे आहे. अनेक गोरगरीब, दीनदुबळे, गरजवंत यांच्या हाकेला धावून जाणारा तरुण अशी त्यांची ख्याती होती  त्यामुळे किशोर भाऊंचे अचानक जाणे म्हणजे तळेगावकरांची मोठी हानी आहे, अशा शब्दात ह.भ.प. रसाळ महाराज यांनी किशोरभाऊंना आदरांजली अर्पण केली.



             जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ यांच्या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त भजनी मंडळ, रुक्मिणी महिला भजन मंडळाची भजन सेवा झाली. माही फाउंडेशन, नैसर्गिक शिक्षण संस्था यांना देणगी देण्यात आली. दिनेश ठोंबरे शिव वंदना सादर केली.

           यावेळी उद्योजक रामदास काकडे, गणेश काकडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिलीप डोळस, ह.भ.प. ढमाले महाराज, बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब काकडे, गणेश खांडगे, सुरेखाताई जाधव, श्रीधर पुजारी, विष्णू खांदवे, सुशील सैंदाणे, नितीन मराठे, अशोक दाभाडे, गिरीश खेर, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.        

          ह. भ. प. रसाळ महाराज म्हणाले, की माणूस किती वर्ष जगला, हे महत्त्वाचे नाही. त्याने समाजासाठी किती योगदान दिले, हे महत्त्वाचे आहे. हीच मनाची श्रीमंती किशोरभाऊंमध्ये होती. 

           रामदास काकडे म्हणाले, की देशाची सेवा करणारा, कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात देत युवकांचे प्राण वाचवले, भाजी मंडई सुरू केली, शेवटच्या क्षणापर्यंत लोकांसाठी झटणारा असा हा युवक होता. गोरगरिबांचे कैवारी म्हणून किशोर आवारे यांचा समाजात नावलौकिक होता. समाजातील दीनदुबळ्या शोषितांना मदत करण्यामध्ये ते कायमच अग्रेसर होते. 

           प्रास्ताविक रामदास काकडे व गणेश काकडे यांनी, तर सूत्रसंचालन कल्पेश भगत यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश