त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रविवारी दीपोत्सव

 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रविवारी दीपोत्सव

तळेगाव स्टेशन दि. 23 (वार्ताहर) तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. दीपोत्सवाचे यंदा आठवे वर्ष आहे.

यादव काळात हेमाडपंथी बनावटीच्या मंदिरांच्या स्थापनेत सुमारे अकराव्या शतकात श्री डोळसनाथ महाराज मंदिराजाची उभारणी झाली आहे. कालानुरूप आजवर चार वेळा मंदिराचा जीर्णोद्धार झाला.

छत्रपती शाहू महाराजांनी श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांना सेनापतीपद दिले. त्यानंतर या मंदिराचे वैभव वाढले. मंदिरात नित्य पूजाअर्चा, भजन, कीर्तन, प्रवचन होत असते.

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हटले जाते. यानिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच हजार दिव्यांनी मंदिर परिसर गजबजणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक, संस्थेचे आधारस्तंभ,माजी नगरसेवक संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे व श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश