अगम्य ज्ञानाची उपलब्धि संशोधकांमुळेच सहजशक्य - न्यायमूर्ती श्री. उदयजी लळीत

 अगम्य ज्ञानाची उपलब्धि संशोधकांमुळेच सहजशक्य - न्यायमूर्ती श्री. उदयजी लळीत

 तळेगाव दाभाडे दि. २३ (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) : समाजाकडून संशोधकांची उपेक्षा होते ही नेहेमी अनुभवायला येणारी गोष्ट आहे. समाजाचा हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे आणि त्यासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या प्रांगणात विद्यावाचस्पतींचा केलेला गौरव हा सर्वार्थाने गौरवास प्राप्त ठरावी अशी घटना असल्याचे मत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केले. 


बहुभाषिक ब्राह्मण संघ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित विद्या वाचस्पती (पीएचडी प्राप्त) गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, उपाध्यक्ष सुधीर राईलकर, सचिव सतीश भोपळे,

खजिनदार सतीश देशपांडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, माजी राजयमंत्री संजय भेगडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या दिनदर्शिकेचे आणि पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना सरन्यायाधीश उदय लळीत म्हणाले की,जे गम्य आहे अशा ज्ञानाची व्याख्या करणे सोपे असते परंतु जे ज्ञान अगम्य आहे ते समाजासाठी सहजतेने उपलब्ध करून देणारे संशोधक हे सरस्वतीचे उपासक असतात असे म्हणून विविध जाती धर्मातील संशोधकांचा सन्मान केल्याबद्दल लळीत यांनी ब्राह्मण संघाचे कौतुक केले.


याप्रसंगी मावळ तालुक्यातील व महाराष्ट्रातील प्राथमिक स्वरूपात ६५ पीएच.डी. पदवी प्राप्त करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला. या सर्वांचे वतीने प्रतिनिधीक स्वरूपात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व नामवंत साहित्यिक डॉ. संभाजी मलघे यांनी सत्काराला उत्तर दिले. जिद्द, चिकाटी, कष्ट आणि मेहनत घेऊन , आपल्या आगळ्यावेगळ्या नाविन्यपूर्ण संशोधनाचा ठसा उमटून राष्ट्राच्या जडणघडणीसाठी आपण योगदान द्यावे. संशोधकांच्या संशोधनामुळे राष्ट्र प्रगतीपथावर जाते. माणूस आणि सृष्टी जगवण्याचे काम संशोधकांमुळे होत असते. अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. व सर्व संशोधकांच्या वतीने दोन्ही संस्थांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश साखवळकर यांनी, सूत्रसंचालन प्रा. जयंत जोर्वेकर यांनी तर सुधीर राईलकर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.




Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश