मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला २ जानेवारी पासून
मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला २ जानेवारी पासून तळेगाव दाभाडे: दि. (वार्ताहर) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे घेण्यात येणा-या मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संपादक उदय निरगुडकर आणि यजुवेंद्र महाजन विचार व्यक्त करणार असून येत्या 2 तारखेस इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्था अध्यक्ष रामदास काकडे यांनी गुरूवारी(दि.28) पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी (दि.2) होणाऱ्या पहिल्या व्याख्यानात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे स्वप्ने बघा. विषयावर व्याख्यान होईल. बुधवारी(ता.3) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कृत्रिम बुध्दिमत्ता (आर्टिफिशिय इंटेलिजन्स) विषयावर व्याख्यान देणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उद्योजक रामदास काकडे असतील. व्याखानाचे तिसरे पुष्प ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्...