गणेश काकडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड
गणेश काकडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड
तळेगाव दाभाडे दि 1 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर ) महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या प्रेरणेने आजवर समाज कार्यात झपाटून गेलेला उच्च शिक्षित युवकांचे नेतृत्व करणारा, यशस्वी उद्योजक, बांधकाम व सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेला हा युवक म्हणजे गणेश काकडे
विविध सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, अध्यात्म आदी क्षेत्रांशी गणेश काकडे याची नाळ जोडलेली आहे.
गणेश काकडे हे यशस्वी बांधकाम व्यावसायिक असून, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या माध्यमातून अनेकांच्या हातांना रोजगार देण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो; तसेच महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सदैव सक्रिय, गरजूंना आर्थिक मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष भेगडे, मा .नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके, शिक्षण मंडळ सदस्य विशाल पवार, मा. नगरसेवक अशोक भेगडे, नंदकुमार कोतूळकर, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर मुलाणी, विकी लोखंडे, महिला अध्यक्षा तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस शैलजा काळोखे, मा उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले.
Comments
Post a Comment