विद्या प्रसारिणी सभेचे 101 व्या वर्षात पदार्पण
विद्या प्रसारिणी सभेचे 101 व्या वर्षात पदार्पण
लोणावळा दि. 5 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) आपल्या विद्या प्रसारिणी सभेला दि.03/12/2023 रोजी शंभर वर्ष पूर्ण होऊन दि.04/12/2023 रोजी 101 वर्षात पदार्पण केले आहे. या शतकपूर्ती सोहळ्या निमित्त विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रो. हुसेन शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याबददल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.आदर्श शिक्षक पुरस्कार विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे यांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमावेळी सभेचे सर्व मा. पदाधिकारी उपस्थित होते सभेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके तसेच नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे, उपस्थित होते. तसेच व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.मानव अ. ठाकूर ,डॉ. हरीश हरसुरकर , प्रो. सोनी राघो, प्रो. प्राणेश चव्हण, प्रो. मनिषा कचरे व रोहित जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment