तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या "अध्यक्षपदी" नगरसेवक / PMRDA सदस्य श्री. संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांची निवड

 तळेगाव दाभाडे  शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या "अध्यक्षपदी" नगरसेवक / PMRDA सदस्य श्री. संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांची निवड. 


तळेगाव दाभाडे दि 1 (डॉ.संदीप गाडेकर) समाज कार्याचा वारसा आणि लोकहितवादी कार्याची आवड तसेच आपले चुलते मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व पी.डी.सी.सी बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या मागर्दर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांच्या प्रेरणेने आजवर समाज कार्यात झपाटून गेलेला उच्च शिक्षित युवकांचे नेतृत्व करणारा, यशस्वी उद्योजक, सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेला हा युवक म्हणजे संतोष छबुराव भेगडे. 

आपले शिक्षण  -  बी. कॉम.  (इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे) येथून पूर्ण केले. 

विविध सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, अध्यात्म आदी क्षेत्रांशी संतोष भेगडे यांची नाळ मुळातच जोडली गेली असल्याने समाजाशी आणि समाजाप्रती त्यांची भावना दृढ असल्याची अनेक उदाहरणे अनुभवली आहेत. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची जबाबदारी सांभाळत असताना छोट्या मोठ्या तसेच उदयोन्मुख उद्योजकांना संतोष भेगडे पाठबळ देत आले आहेत. नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना एकत्रित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्यही ते करत असतात.

संतोष भेगडे हे यशस्वी बांधकाम व्यावसायिक असून, या माध्यमातून अनेकांच्या हातांना रोजगार देण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो; तसेच महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सदैव सक्रिय, गरजूंना आर्थिक मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी यासारख्या पारंपरिक उत्सवांमध्ये तसेच तळेगाववासीयांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवामध्ये हिरीरीने सहभागी होऊन गावातील सर्वांना सहभागी करून घेण्यात त्यांचा पुढाकार असतो.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीसपद असो, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिवपद असो, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद असो अथवा नगरसेवकपद, PMRDA  सदस्यपद असो प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवीत संतोष भेगडे यांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे तसेच पक्षाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीसाठी आपण पात्र असल्याचे पक्षश्रेष्ठी व संघटनेला दाखवून दिले आहे. 

सामाजिक व राजकीय या दोन्ही बाबींचे  सुयोग्य समीकरण करून केवळ नगरसेवक नव्हे तर एक समाजसेवक म्हणून संतोष भेगडे यांनी कोरोनाच्या महासंकटात आपले कार्यक्षेत्र असलेले तळेगाव शहर आणि प्रभाग क्रमांक ११ मधील उपाययोजनांसाठी सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे.

अशा समाज कार्याचा वसा घेतलेल्या नेतृत्वाची तळेगाव दाभाडे  शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या "अध्यक्षपदी" सार्थ निवड झाली आहे.  

मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,  मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे  शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  वरिष्ठ उपाध्यक्ष  गणेश काकडे, मा .नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके, शिक्षण मंडळ सदस्य विशाल पवार,  मा. नगरसेवक अशोक भेगडे, नंदकुमार कोतूळकर, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर मुलाणी, विकी लोखंडे, महिला अध्यक्षा तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस शैलजा काळोखे, मा उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या उपस्थित निवडीचे पत्र  देण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश