हॅपी फ्लावर्स प्री प्रायमरी स्कूलचे तळेगाव दाभाडे, स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

 हॅपी फ्लावर्स प्री प्रायमरी स्कूलचे तळेगाव दाभाडे,  स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

तळेगाव स्टेशन दि. १०  (प्रतिनिधी) येथील कालेकर एज्युकेशन सोसायटीच्या तळेगाव दाभाडे येथील हॅपी फ्लॉवर्स प्री प्रायमरी स्कूलचे "वार्षिक स्नेहसंमेलन" अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले .    कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने करताना येणाऱ्या प्रत्येक मुलाचे पालकांचे स्वागत जोकर द्वारे केल्यामुळे "हॅप्पी फ्लॉवर्स" मध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी येतानाच 'हॅपी' झाला.


प्रायमरी सेक्शन मधील बालचमुने  एवढ्या लहान वयात विविध कलागुण सादर केले. यामध्ये कोळीगीत, लेट्स शाईन  असे ग्रुप डान्स सादर  करण्यात आले. त्याबरोबर वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या लहान वयात 2 ते 5 या वयोगटातील 13 विद्यार्थ्यांनी हजार हात हे स्वामी समर्थांवर आधारित नाटक सुद्धा सादर केले. आणि प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा महा गजर झाला. कार्यक्रमाची सांगता करताना सांता अवतरला आणि त्याबरोबर सुरुवातीला आलेला जोकर सुद्धा उतरला. यामुळे तर बालचमुनमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आनंदाचे वातावरण तयार झाले आणि सगळे अतिशय आनंदित झाले. सांतानी सर्वांना भेटवस्तू देऊन नवीन वर्षाचे शुभचिंतन केले आणि कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली.

सर्व शिक्षक वर्ग,  मुख्याध्यापक अध्यक्ष सौ पुनम कालेकर यांचे उत्कृष्ट नियोजन या आणि त्यांना सर्व पालकांनी दिलेले सहकार्य तसेच लहान विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत या कार्यक्रमाची उंची वाढवून गेला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. श्रीवल्लभ कालेकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश